03 May, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खते, बि-बियाणांची दुकाने व परवानाधारक कृषि केंद्रे सुरु ठेवण्याकरीता वेळापत्रक जाहिर



·   दिलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन दुकाने सुरु ठेवण्याचे निर्देश

हिंगोली,दि.03: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक निर्माण होऊ शकतो. यामुळे  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
खरीब हंगाम हा जवळ येत आहे व व्यापा-यांना खते व बियाणेचा साठा करण्यासाठी तसेच शेतीसाठी उपयोगी महत्वाचे साहित्य जसे की, ड्रीप, स्पिंकलर व पाईप पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे करीता ही सर्व दुकाने व जिल्ह्यातील परवाना धारक कृषी केंद्र उघडणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन सुरु ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत.
अ.क्र.
दिनांक
वार
वेळ

1
04/05/2020
सोमवार




   सकाळी 09.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत

2
06/05/2020
बुधवार
3
08/05/2020
शुक्रवार
4
10/05/2020
रविवार
5
12/05/2020
मंगळवार
6
14/05/2020
गुरुवार
7
16/05/2020
शनिवार

सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक राहील, त्या पुढील प्रमाणे आहेत. संबंधितांनी दि. 04 मे, 2020 पासुन दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारांसाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या, हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     
****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दूकाने सुरु ठेवण्याकरीता वेळापत्रक जाहिर



हिंगोली,दि.03: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक होत आहे. यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3)  अन्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  
सद्यपरिस्थीती विचारात घेता किराणा माल विक्री दुकाने, भाजीपाला विक्री करणारे दुकाने, दुध विक्री केंद्र, परवाना असलेले चिकन / मटन शॉप, बेकरी, स्वीट मार्ट संबंधीत दुकाने खालील प्रमाणे ठरवून देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार एक दिवस आड तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

अ.क्र.
दिनांक
वार
वेळ

1
04/05/2020
सोमवार




   सकाळी 09.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत

2
06/05/2020
बुधवार
3
08/05/2020
शुक्रवार
4
10/05/2020
रविवार
5
12/05/2020
मंगळवार
6
14/05/2020
गुरुवार
7
16/05/2020
शनिवार

सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक राहील. त्या अटी व शर्ती अश्या की, संबंधितांनी दि. 04 मे, 2020 पासुन दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारासाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारासाठी पिण्याच्या व हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
त्या नुसार सामान खरेदीसाठी नागरिकांना पायी जावे लागणार आहे. त्यांना दूचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा वापर करता येणार नाही. नागरीकांची वाहने रस्त्यावर येऊ नये याकरीता आवश्यक त्या ठिकाणी बॅरीकेटींगचा वापर करावा.
 आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     

****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात 17 मे पर्यंत कलम 144 लागू राहणार



हिंगोली,दि.03:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात नागरिकांनी येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनता व त्‍यांचे आरोग्‍यास धोका असल्‍याने त्‍याकरिता तात्‍काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जनतेस, खालील व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 दि. 03 मे, 2020 पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते. परंतू सदरचा कालावधी आता हा दि. 17 मे, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात दि. 04 मे, 2020 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते दि. 17 मे, 2020 च्या 24.00 वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील संपुर्ण हद्दी मध्ये राहणाऱ्या जनतेसाठी जमावबंदी आदेश लागू करीत असून या कालावधीत (5) पाच व त्‍या पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींनी जमण्‍यास किंवा एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
या आदेशान्वये हिंगोली जिल्‍ह्यात सांस्‍कृतिक, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, कार्यक्रम, सण, उत्‍सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम क्रिडा व इतर सर्व स्‍पर्धांना मनाई करण्यात येत आहे. तसेच खाजगी व सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा, कॅम्‍प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, देशातंर्गत व परदेशी सहली इत्यादीचे आयोजन करता येणार नाही. तसेच जिल्‍ह्यात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येतील असे सर्व दुकाने/सेवा आस्‍थापना, उपहार गृहे / खाद्यगृहे / खानावळ, शॉपींग कॉम्‍लेक्‍स, मॉल्‍स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्‍लब/पब क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्‍यायामशाळा, संग्रहालय तसेच सर्व प्रार्थनास्थळे (उदा. मंदीर, मस्जीद, चर्च, गुरुद्वारा, बौध्द विहार इत्यादी) जनतेसाठी बंद राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरीकांना अनावश्‍यकरित्‍या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणांशिवाय येण्‍यास मनाई करण्यात येत आहे.
सदरील आदेश खालील बाबीकरीता लागु होणार नसून, यामध्ये शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / अस्‍थापना, अत्‍यावश्‍यक सेवेतील व्‍यक्‍ती, रुग्‍णालय, पॅथॉलॉजी-लॅबोरेटरी, दवाखाना सर्व प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय (अॅलोपॅथी, आयुर्वेदीक, होमिओपॅथी), नर्सिंग कॉलेज, रेल्‍वे स्‍टेशन, एस. टी. स्‍टॅण्‍ड, परिवहन थांबे व स्‍थानके, रिक्षा थांबे, बँक, पेट्रोल पंप तसेच अंत्‍यविधी (कमाल 10 व्‍यक्‍तीपुरता मर्यादित राहिल), औषधालये उपहारगृहांनी योग्‍य ती सर्व खबरदारी घेवुन त्यांना खाद्यपदार्थ बनविणे, तसेच पार्सल स्‍वरुपात काऊंटर व इतर मार्गानी विक्री/वितरीत करण्‍यास परवानगी राहणार आहे. सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्‍तव्‍यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्‍यविषयक आवश्‍यक ती खबरदारी घेवुन रेस्‍टॉरंटमध्‍ये खाद्यपदार्थ बनवुन देण्‍यास परवानगी राहिल. ज्‍या आस्‍थापना (उदा. माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्‍यांच्‍याकडे देश व परदेशातील अतिमहत्‍वाच्‍या (Critical-National & International Infrastructure ) उपक्रमाची जबाबदारी आहे. व सदर आस्‍थापना बंद राहिल्‍याने अशा उपक्रमांच्‍या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित उपक्रम कार्यान्वित राहु शकतील. (परंतू यादृष्‍टीने सदर आस्‍थापना कार्यरत ठेवण्‍याच्‍या आवश्‍यकतेबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात विशेषरित्‍या कळविणे बंधनकारक आहे.) तसेच प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालीके, टि.व्ही. न्‍युज चॅनेल इत्यादी) कार्यालय, घरपोच देणाऱ्या सेवा उदा. अॅमेझॉन, फ्लीपकार्ट, इ. सेवा सुरु राहतील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.  उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्यथ्‍वस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्‍वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्राप्‍त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्‍यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्‍यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्‍टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

02 May, 2020

हिंगोलीत 6 नवीन कोरोना बाधीत रुग्ण, जिल्ह्यात एकुण 52 कोरोना बाधीत रुग्ण -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास

हिंगोली दि.02: येथीलराज्य राखीव बलातील बंदोबस्ताहून आलेले नवीन 5 जवान आणि सेनगाव येथील एक व्यक्तीअशा एकूण 6 जणांना कोवीड-19 ची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाल्याने हिंगोलीत कोरोनाबाधीतांची संख्या 52 झाली आहे.हिंगोली येथे राज्य राखीव बलातील एकुण 46जवानांना कोवीड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील 33 जवान हे मालेगावतर 13 जवान हे मुंबई येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते. यामध्ये कोविड-19 ची लागणझालेले हिंगोली येथील राज्य राखीव बलातील एकूण 46 जवान हे येथील जिल्हा सामान्यरुग्णालयातील आयसोलेशन वार्डात भरती आहेत. तर जालना राज्य राखीव बल येथील 01 जवान,तसेच या जवानाच्या संपर्कात आलेले 02 व्यक्ती, सेनगाव येथील 01 बालक, बार्शी येथूनवसमत येथे आलेला 01 व्यक्ती आणि सेनगाव येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने 48वर्षाच्या 01 रुग्णांचा समावेश आहे.यातील 47 रुग्ण हे हिंगोली येथील आयसोलेशनवार्डमध्ये भरती असुन, 4 रुग्णांना औरंगाबाद येथे तर 1 रुग्ण हा सेनगाव येथीलक्वारंटाईन सेंटरमध्ये भरती असुन असे जिल्ह्यात एकुण 52 रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञडॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत असुन, सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याहीप्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतअसल्याने नागरिकांनी आता सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेचनागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्याआरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्यकरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेआहे.
****

01 May, 2020

हिंगोलीत 26 नवीन कोरोना बाधीत रुग्ण


·   जिल्ह्यात एकुण 44 कोरोना बाधीत रुग्ण
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास

हिंगोली दि.01: येथील राज्य राखीव बलातील बंदोबस्ताहून आलेल्या नवीन 25 जवान आणि नांदेड येथील अडकलेल्या भाविकांना पंजाब येथे सोडण्यासाठी गेलेला एक व्यक्ती अशा एकूण 26 जणांना कोवीड-19 ची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
हिंगोली येथे राज्य राखीव बलातील एकुण 41 जवानांना कोवीड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील 33 जवान हे मालेगाव तर 8 जवान हे मुंबई येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते. यामध्ये कोविड-19 ची लागण झालेले हिंगोली येथील राज्य राखीव बलातील एकूण 40 जवान हे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात भरती आहेत. तर जालना राज्य राखीव बल येथील जवानास औरंगाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. तसेच या जवानाच्या संपर्कात आलेले 02 व्यक्ती, सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमधील एक बालक, आणि बार्शी येथून वसमत येथे आलेला 1 व्यक्ती असे एकुण 44 रुग्णांना हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे.
तर हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील एक व्यक्ती खाजगी ट्रॅव्हल्सवर कार्यरत असून, तो भाविकांना सोडण्यासाठी पंजाब येथे गेला होता. तो परतल्यानंतर शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, नांदेड येथे त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतू आज सकाळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यास नांदेड येथील शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. तसेच एका रुग्णास औरंगाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
 या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत असुन, सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आता सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.  कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा दिलासा



·         जिल्ह्यात परराज्यातील / परजिल्ह्यातील अडकुन पडलेल्या नागरिकांना आपल्या निवासाच्या ठिकाणी परतण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित

            हिंगोली, दि.01: लॉकडाऊनमुळे  परराज्यातील / परजिल्ह्यातील अडकुन पडलेल्या नागरिकांसाठी आपल्या निवासाच्या ठिकाणी परत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याकरीता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत अधिकारी म्हणुन घोषीत केले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये परराज्यातील / परजिल्ह्यातील जे मजूर अथवा व्यक्ती अडकल्या आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या राज्यामध्ये  किंवा त्यांच्या इच्छित स्थळी जाण्याकरीता कार्यपध्दती अवलंबविण्यात आली आहे.
            यामध्ये कॅम्पमध्ये जे मजूर आहेत त्यांच्याबाबतीत ते ज्या राज्यातील निवासी आहेत अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना यादीसह संपर्क साधुन त्यांची सहमती घेण्यात येणार आहे. संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडून सहमती मिळल्यानंतर संबंधीत मजुरांना वाहनाद्वारे त्यांच्या मुळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची सोय करण्यात येणार आहे. या व्यतीरीक्त इतर राज्यातील अथवा जिल्ह्यातील व्यक्ती हिंगोली जिल्ह्यात अडकून पडल्या असतील व ते त्यांच्या मूळ गावी वास्तव्याच्या जिल्ह्यात जावू इच्छीत असतील अशा व्यक्तींनी प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नावासह तसेच वाहनाचा प्रकार व क्रमांक या बाबी नमूद करुन हिंगोली जिल्ह्यातील संबंधीत उपविभागीय अधिकारी यांचा ई-मेल (sdohingoli123@gmail.com, sdokalamnuri@gmail.com, sdobasmath0@gmail.com) वर अर्ज करावा.
            तसेच प्रवास करण्यापुर्वी अशा व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध करणे, संबंधीत जिल्हा प्रशासनाशी संपर्क करुन सहमती प्राप्त करणे ई. बाबी झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी हिंगोली यांच्याकडून वाहतुक परवानगी उपलब्ध करुन देण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यातील रहीवाशी असलेल्या ज्या व्यक्ती अन्य राज्यात किंवा जिल्ह्यात अडकुन पडल्या असतील अशा व्यक्तींनी सद्यस्थितीत वास्तव्यास असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून वाहतुक परवानगी प्राप्त करुन घेवून त्याची प्रत या कार्यालयाच्या rdc.hingoli123@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावी.
            परराज्यातून / परजिल्ह्यातून परवानगी घेवून प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना ते राहत असलेल्या ठिकाणाच्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधून तपासणी करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच संबंधीतास 14 दिवस गृह विलगीकरण (Home Quarantine) करुन घेणे बंधनकारक असणार आहे.
            वरील नियमाचे भंग करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केल्याचे समजून कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधीकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण



            हिंगोली,दि.01:  जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न झाला.   
            यावेळी जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, राज्य राखीव बलाचे महासमादेशक मंचक इप्पर, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर यांची उपस्थिती होती.
****