01 May, 2020

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा दिलासा



·         जिल्ह्यात परराज्यातील / परजिल्ह्यातील अडकुन पडलेल्या नागरिकांना आपल्या निवासाच्या ठिकाणी परतण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित

            हिंगोली, दि.01: लॉकडाऊनमुळे  परराज्यातील / परजिल्ह्यातील अडकुन पडलेल्या नागरिकांसाठी आपल्या निवासाच्या ठिकाणी परत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याकरीता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत अधिकारी म्हणुन घोषीत केले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये परराज्यातील / परजिल्ह्यातील जे मजूर अथवा व्यक्ती अडकल्या आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या राज्यामध्ये  किंवा त्यांच्या इच्छित स्थळी जाण्याकरीता कार्यपध्दती अवलंबविण्यात आली आहे.
            यामध्ये कॅम्पमध्ये जे मजूर आहेत त्यांच्याबाबतीत ते ज्या राज्यातील निवासी आहेत अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना यादीसह संपर्क साधुन त्यांची सहमती घेण्यात येणार आहे. संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडून सहमती मिळल्यानंतर संबंधीत मजुरांना वाहनाद्वारे त्यांच्या मुळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची सोय करण्यात येणार आहे. या व्यतीरीक्त इतर राज्यातील अथवा जिल्ह्यातील व्यक्ती हिंगोली जिल्ह्यात अडकून पडल्या असतील व ते त्यांच्या मूळ गावी वास्तव्याच्या जिल्ह्यात जावू इच्छीत असतील अशा व्यक्तींनी प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नावासह तसेच वाहनाचा प्रकार व क्रमांक या बाबी नमूद करुन हिंगोली जिल्ह्यातील संबंधीत उपविभागीय अधिकारी यांचा ई-मेल (sdohingoli123@gmail.com, sdokalamnuri@gmail.com, sdobasmath0@gmail.com) वर अर्ज करावा.
            तसेच प्रवास करण्यापुर्वी अशा व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध करणे, संबंधीत जिल्हा प्रशासनाशी संपर्क करुन सहमती प्राप्त करणे ई. बाबी झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी हिंगोली यांच्याकडून वाहतुक परवानगी उपलब्ध करुन देण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यातील रहीवाशी असलेल्या ज्या व्यक्ती अन्य राज्यात किंवा जिल्ह्यात अडकुन पडल्या असतील अशा व्यक्तींनी सद्यस्थितीत वास्तव्यास असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून वाहतुक परवानगी प्राप्त करुन घेवून त्याची प्रत या कार्यालयाच्या rdc.hingoli123@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावी.
            परराज्यातून / परजिल्ह्यातून परवानगी घेवून प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना ते राहत असलेल्या ठिकाणाच्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधून तपासणी करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच संबंधीतास 14 दिवस गृह विलगीकरण (Home Quarantine) करुन घेणे बंधनकारक असणार आहे.
            वरील नियमाचे भंग करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केल्याचे समजून कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधीकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

No comments: