07 May, 2020

पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा सुधारित जिल्हा दौरा


        हिंगोली,दि.07: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री  प्रा. वर्षाताई गायकवाड या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
            पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या शुक्रवार, दि. 08 मे,2020 रोजी  सकाळी 06.00 वाजता मुंबई येथून वाहनाने हिंगोलीकडे प्रस्थान करतील. हिंगोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे मुक्काम करतील.
तसेच पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या शनिवार, दि. 09 मे,2020 रोजी, सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजित कोरोना (कोविड-19) च्या अनुषंगाने प्रशासकीय बैठक, दूपारी 12.00 वाजता टंचाई आढावा बैठक, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आढावा बैठक आणि शासकीय धान्य वाटप योजना प्रशासकीय आढावा बैठकीस उपस्थित राहून आढावा घेणार आहेत.   
रविवार, दि. 10 मे, 2020 रोजी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून सोईनुसार मुंबईकडे प्रयाण करतील.  
*****


No comments: