हिंगोली, दि.24: सेनगाव तालुक्यात मुंबई
येथून 10 तर दिल्ली येथून 03 अशा एकूण 13 परतलेल्या व्यक्तींना कोविड-19 ची लागण
झाल्याचे प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
तर हिंगोलीतील लिंबाळा येथे तयार करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटर
मध्ये 31 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
यामध्ये 22 मुंबई येथून तर औरंगाबाद 04, रायगड 01, बिदर (कर्नाटक) 01 हून हिंगोली तालुक्यात परतले आहेत. तर 02
रुग्ण हे भिरडा येथील बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहेत. आणि 01 समुदाय आरोग्य
अधिकारी असे एकूण 31 रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
तसेच औरंगाबाद येथील रुग्णालयात 02 रुग्ण भरती आहेत. तर वसमत येथील
कोरोना केअर सेंटर मध्ये 13 रुग्ण आणि हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 03
असे एकूण 62 रुग्णांवर जिल्ह्यात सद्यपरिस्थीतीत उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 151 व्यक्तींना कोविड-19 ची लागण
झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 89 रूग्ण बरे झाल्याने त्यांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 62 कोरोना बाधीत रुग्ण असून या
सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात
येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही
प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून
आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन
जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment