बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कतेने नियोजीत बाल विवाह टळला
हिंगोली,दि.26: वसमत तालुक्यातील एका
14 वर्षीय मुलीचा विवाह दि.26 मे, 2020 रोजी
नियोजित होता. 25मे रोजी बाल विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री
क्रमांकावर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांना प्राप्त
होताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे
यांच्या नियोजनानुसार बाल विवाह रोखण्यात आला.
मुलीचे आई-वडील
आणि चुलता यांना बाल विवाह कायदा 2006 नुसार बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.
तसेच बाल विवाह केल्यामुळे मुला-मुलीवर होणारे दुष्परिणाम शारिरीक व मानसिक घटकांवर
होणारे दूरगामी परिणाम तसेच कायद्याचा भंग केल्यास योग्य ती कारवाई होवू शकते अशी समज
दिल्यावर मुलीच्या कुटूंबातील सदस्य बालविवाह थांबविण्यास तयार झाले.
बालविवाह थांबविण्याबाबत
कुटूंबाकडून लेखी जबाब घेण्यात आला. सदर बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईन हिंगोलीचे टिम
सदस्य तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर गावातील बालविवाह
प्रतिबंध अधिकारी ग्रामसेवक, सरपंच, मुख्याध्यापक, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी
बालविवाह रोखण्यास सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल
शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
****
No comments:
Post a Comment