एकूण
38 कोरोना बाधीत रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज.
- सद्यस्थितीत
53 रुग्ण बाधीत, सर्वांची प्रकृती स्थिर.
हिंगोली,दि.12: मुंबई व मालेगाव येथून बंदोबस्ताहून आलेल्या राज्य राखीव बलातील सोमवार
दि. 11 मे,2020 रोजी 15 जवानांचा तर इतर 05 असे एकूण 20 रुग्णांचा तर दि. 12 मे,
2020 रोजी 18 जवानांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने एकूण 38 रुग्णांना डिस्चार्ज देवून
घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज रोजी पर्यंत जिल्ह्यात कोवीड-19 चे एकूण 53 रुग्ण बाधीत
असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल
डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या
कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment