· कापूस विक्री करण्यास इच्छुक शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे
पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे आवाहन
हिंगोली दि. 04:
शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस उद्योगावर अवलंबून असून जिल्ह्यात चांगल्या प्रतीचा
कापूस उत्पादन झाला आहे. शेतीपूरक उद्योगांना मुभा देण्याची केंद्र व राज्य
शासनाची भूमिका आहे. जिल्ह्यात जवळा बाजार आणि वसमत येथील बाजार समितीच्या
नियंत्रणाखाली सुखमणी जिनिंग मार्डी, ता. औंढा ना. (खरेदी करणारी एजन्सी-CCI) आणि
पूर्णा ग्लोबल जिनिंग, हयातनगर, ता. वसमत (खरेदी करणारी एजन्सी-CCI) येथे 20
एप्रिलपासून कापूस विक्रीकरीता नोंदणीची सुरुवात झाली असुन जिल्ह्यातील कापूस
विक्रीची नोंद करु इच्छिणात्या शेतकऱ्यांनी या दोन खरेदी केंद्रावर आपली नोंदणी
करावी.
आज कापुस विक्री नोंदणीचा अखेरचा
दिवस असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवानी शासकीय कापूस विक्री नोंदणीसाठी https://forms.gle/x2Jau6D4FAdNgfib7 या लिंकवर आपली
माहिती भरावी. तसेच सदर माहिती भरतांना आपल्याकडील कापसाचा आपल्या सोबतचा सेल्फी फोटो
‘नोट कॅम’ ॲपद्वारे काढून अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपली नोंदणी ग्राह्य
धरली जाणार नाही. शेतकऱ्यांचा एफ.ए.क्यू. दर्जाचा कापूस असेल तरच शासकीय खरेदी केली
जाणार आहे. फरदड कापूस, कवडी कापूस, नॉन एफ.ए.क्यू. दर्जाच्या कापसाची शासकीय
खरेदी केली जाणार नाही.
तरी कापूस विक्री करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी आजच आपली
कापुस विक्री नोंदणी करण्याचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या
पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment