हिंगोली,दि.01: जिल्हाधिकारी कार्यालयात आज
महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या
हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न झाला.
यावेळी जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा
विनोद शर्मा, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, राज्य राखीव बलाचे महासमादेशक मंचक
इप्पर, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर
यांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment