·
नगर परिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुल व
बाजारातील मद्य विक्री दुकाने वगळून तसेच कंटेनमेंट झोनमधील मद्य विक्री दुकाने
वगळून जिल्ह्यातील इतर सर्व मद्याची दुकाने चालु राहणार
हिंगोली, दि.12: जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील
सर्व मद्य विक्री अनुज्ञप्त्या पुढील आदेशापर्यंत पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात
आलेले होते. आपत्ती व्यवस्थापन कायदा
2005 व मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) च्या अधिकारानुसार सुधारित ओदशानुसार
हिंगोली जिल्ह्यातील ‘नगर परिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री
दुकाने वगळून तसेच कंटेनमेंट झोनमधील मद्य विक्री दुकाने वगळून’ जिल्ह्यातील इतर सर्व मद्याची दुकाने खालील दिवशी व वेळेप्रमाणे चालु
राहणार आहेत.
अ.क्र
|
दिनांक
|
अनुज्ञप्ती
प्रकार
|
वेळ
|
01
|
14.05.2020
व
16.05.2020
|
सीएल-3
(देशी मदय किरकोळ मदयविक्री अनुज्ञप्ती )
|
सकाळी 8.00 ते दुपारी 1.00
|
02
|
एफएल-2
/सीएलएफएलटिओडी-3 (देशी / विदेशी मदयाची सीएलबंद विक्री अनुज्ञप्ती)
|
सकाळी
10.00 ते दुपारी 1.00
|
|
03
|
एफएलबीआर-2
(बियर व वाईची बंद बाटलीतुन मदय विक्री अनुज्ञप्ती )
|
सकाळी
10.00 ते दुपारी 1.00
|
|
04
|
सीएल-2
(देशी मदयाची ठेाक विक्री अनुज्ञप्ती)
|
सकाळी
10.00 ते सायंकाळी 5.00
|
|
05
|
एफएल-1
(विदेशी मदयाची ठेाक विक्रीची अनुज्ञप्ती )
|
सकाळी
10.00 ते सायंकाळी 5.00
|
याकरीता राज्य उत्पादन शुलक् विभागाचे आयुक्त यांनी
मार्गदर्शक तत्वे विहित केली असुन यामध्ये मद्याचे घाऊक / ठोक विक्रेत्यांबाबत (अनुज्ञप्ती
नमुना एफएल-1, सीएल-2) ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेते यांचे व्यवहार चालू करण्यात येतील. शहरी भागातील
कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील घाऊक मद्य विक्रेत्यांचे व्यवहार चालू करण्यात
येतील. तथापि सायंकाळी 5.00 वाजेनंतर व्यवहार सुरु ठेवता येणार नाही. भारत सरकार,गृह मंत्रालय आदेश क्र. 40-3/2020-डीएम-1(ए),दि.
1 मे 2020 मधील परिशिष्ट एक नुसार कामाच्या ठिकाणी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे घाऊक
विक्रेत्यांवर बंधनकारक राहील. संबंधित अनुज्ञप्तीमधील सर्व नोकरांची / कामगारांची
थर्मल स्कॅनिंग करावी व ज्या नोकरास किंवा कामगारास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे
आहेत त्यांस अनुज्ञप्तीमध्ये प्रवेश देऊ नये. घाऊक विक्रेत्यांनी 50% मनुष्यबळावर काम
करावे व सोशल डिस्टंसिंग पाळावे.
तर किरकोळ मद्यविक्री दुकाने
(नमुना एफएल-2, एफएल/बीआर-2, व सीएल-3 यांना फक्त वरील अनुज्ञप्ती प्रकार पुढील निकषांच्या
आधारे चालू करता येतील व सदर अनुज्ञप्ती प्रकारातून फक्त सीलबंद मद्यविक्री करण्यास
परवानगी राहील. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरु करता येतील. व शहरी
भागात महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री
दुकाने चालू करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व
प्रकारची स्वतंत्र (Stand alone) किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी
संकुलातील उक्त अनुज्ञप्ती सुरु करता येतील. मद्य पिण्याचा प्रमाणित परवाना असल्याशीवाय
मद्य विक्री होणार नाही व रांगेतही उभे राहता येणार नाही. तसेच जवान व सहा. दुय्यम
निरीक्षक यांना सोशल डिस्टंसींगचे पालन व गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नेमणुक करण्याची
जबाबदारी संबधीत कार्यक्षेत्रीय निरीक्षक व दुयम निरीक्षक यांची राहणार आहे. सीलबंद
मद्य विक्री करणाऱ्या दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत व दोन
ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर असणे अनिवार्य राहील, याकरीता दुकानासमोर सहा फूटांवर
वर्तुळ आखून घ्यावीत. संबंधित अनुज्ञप्तीधारकाने सर्व नोकरांची / ग्राहकांची थर्मल
स्कॅनिंग करावी व ज्या नोकरास / ग्राहकास सर्दी,
खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तींना दुकानात प्रवेश देऊ नये. दुकान व सभोवतालचा
परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी
हॅंड रब सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्तीधारकाची
राहील. भारत सरकार, गृह मंत्रालय आदेश क्र. 40-3/2020-डीएम-1 (ए),दि. 1 मे 2020 मधील
परिशिष्ट एक मधील कामाच्या ठिकाणी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे किरकोळ विक्रेत्यांना
पाळणे आवश्यक राहील. अशा किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये लॉकडाऊनबाबतची मार्गदर्शक
तत्वे पाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्तीधारकाची असेल.
मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 च्या नियम 70(डी) अन्वये विहित केलेली मद्य बाळगणे /
खरेदी करणे याच्या क्षमतेचा भंग होणार नाही, याची संबंधित मद्यविक्रेत्याने आवश्यक
काळजी घ्यावी.
कोणत्याही परिस्थितीत उघडलेल्या मद्य विक्रीच्या आस्थापनांमध्ये
मद्य प्राशन होणार नाही याची दक्षता घ्यावी व अशी बाब आढळल्यास प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात
येईल. अशा कोणत्याही दुकानाने सदर मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास त्यांचे दुकान तात्काळ
बंद करण्यात येईल व त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्यात
येईल. अनुज्ञप्तीधारकांना दुकानासमोर बॅरीकेडींग लावुन घ्यावे लागणार आहे.
अनुज्ञप्तीधारक / नौकर नामाधारक
यांनी हॅन्ड ग्लोव्जचा वापर करावा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य,
मुंबई यांचे पत्र क्र. एफएलआर1020/ कोव्हीड-19/ सात, दि. 04.05.2020 मधील सर्व सुचनांचे
पालन करणे अनुज्ञप्तीधारकास बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक सीलबंद किरकोळ मद्य विक्री
करणाऱ्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात सहजरित्या दिसेल असा फलक लावावा लागणार
आहे. या फलकावर पुढील तपशील छापावा लागणार आहे. अ) दुकानाच्या कामकाजाच्या सुधारित
वेळा, (ब) एकावेळी दुकानासमोर 5 पेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत., (क) Social
Distancing व Mask चा वापर अनिवार्य आहे., (ड) सर्व ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात
येईल. ज्या ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तींनी दुकानात
प्रवेश करु नये., (इ) दुकानात मद्यप्राशन करता येणार नाही.(फ) परिसरात थुंकण्यास सक्त
मनाई आहे. (ग) दुकानाकडून / ग्राहकांकडून नियमभंग झाल्यास त्यांचेविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये
कडक कारवाई केली जाईल. तसेच कोणतीही खाद्यगृह मद्य विक्री आस्थापना अथवा केवळ बसून
पिण्याची सोय असलेली आस्थापना मधून मद्य विक्री होणार नाही. या वरील मार्गदर्शक तत्वांचा
अवलंब करण्याच्या अटींवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, यांनी नगर परिषद हद्दीतील मॉल्स,
बाजार संकुल व बाजारातील मद्य विक्री दुकाने तसेच कंटेनमेंट झोन मधील मद्य विक्री दुकाने
वगळुन जिल्ह्यातील इतर सर्व मद्याची दुकाने चालू ठेवण्याकरीता आदेशान्वये परवानगी दिली
आहे.
या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन
कायदा, 2005 च्या कलम 51 ते 60 अन्वये तसेच
भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल होण्यास पात्र असलेला अपराध केला
असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा व्यक्ती किंवा
संस्था महाराष्ट्र दारुबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस
पात्र असतील. सदर आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तात्काळ रद्द करण्यात
येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment