04 May, 2020


मौजे पांगरी येथील रास्तभाव दुकानावर कारवाई
·   मौजे इंचा येथे पर्यायी सेवा उपलब्ध

हिंगोली,दि.04:  हिंगोली तालूक्यातील मौ. पांगरी येथील रास्तभाव दुकानदार यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार प्राप्त झाल्याने हिंगोली तहसिलदार यांनी चौकशी करुन सदर दुकानदाराच्या विरुध्द निलंबनाच्या कार्यवाहीचा प्रस्ताव सादर केला. सदर अहवालानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत संबंधित रास्तभाव दुकानदारांचा परवाना निलंबित केला आहे. मौ. पांगरी येथील रास्तभाव दुकानाची पर्यायी व्यवस्था मौ. इंचा येथे करण्यात आली असून, त्याठिकाणी सर्व योजनेतंर्गत अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदरील पर्यायी व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येत आहे. तसेच पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. सदर वितरणाची शासकीय प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
मौ. पांगरी येथील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी आपण स्वत: रास्तभाव दुकानामध्ये जावून शिधापत्रिकेनुसार अन्नधान्य उचल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*****

No comments: