· जिल्ह्यात एकुण 15 कोरोना
बाधीत रुग्ण
हिंगोली दि.20: मुंबई येथून जिल्ह्यात परतलेल्या 01 व्यक्तींस कोविड-19 ची लागण
झाल्याचे आज प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले असून त्यास क्वारंटाईन
सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. सदर बाधीत रुग्ण वसमत येथील बाधीत असलेल्या रुग्णांसोबत मुंबई
येथे कामाला होता.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 100 व्यक्तींना कोविड-19 ची लागण
झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असून त्यातील 85 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 कोरोना बाधीत रुग्ण असून या
सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात
येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही
प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल
डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या
आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास
सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले
आहे.
****
No comments:
Post a Comment