24 February, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 27 रुग्ण ; तर 09 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  158 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात 27 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे वसमत परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 24 व्यक्ती, सेनगाव परिसर 02 व्यक्ती असे एकूण 27 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 09 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 03 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 11 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 981 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 764 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 158 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 59 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

23 February, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

 


 

        हिंगोली,दि.23: संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नायब तहसिलदार डी. एस. जोशी, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी ही यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

*****

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 38 रुग्ण ; तर 03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  140 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात 38 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 09 व्यक्ती व कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 22 व्यक्ती, वसमत परिसर 02 व्यक्ती, औंढा परिसर 02 व्यक्ती व कळमनुरी परिसर 02 व्यक्ती असे एकूण 38 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 03 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 06 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 01 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 07 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 954 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 755 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 140 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 59 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात 25 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

 


 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय भवन येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने वेबीनारचे     दि. 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

हा वेबीनार झूम ॲपवर होणार असून या वेबिनारसाठी मिटींग आयडी : 462 449 3823, पासवर्ड : 1234 असा आहे. या वेबिनारमध्ये अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करतांना येणाऱ्या अडचणी व जात वैधता पडताळणीसाठी अर्ज सादर करावयाची पध्दत यामध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या वेबिनारमध्ये जॉईन होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी / उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांनी केले आहे.

 

****

22 February, 2021

शेतकऱ्यांनी हळद पिकासाठी सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण करुन घ्यावे नोकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देशमुख यांचे आवाहन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण केल्यानंतर मालाची विक्री करण्यासाठी खूप वेळ लागतो हा गैरसमज दूर  करुन शेतकऱ्यांनी हळद पिकासाठी सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पुणे येथील नोकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देशमुख यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर आणि किसान यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने "स्थानिक बाजारपेठेसाठी व निर्यातीसाठी सेंद्रीय हळद शेतीचे प्रमाणीकरण" या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी श्री. देशमुख बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. देशमुख म्हणाले, सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागतो. मात्र चांगल्या पद्धतीने सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यास दोन वर्षांनी सुद्धा प्रमाणीकरण करता येऊ शकते. सेंद्रीय शेतीची नोंदणी केल्याबरोबर "सर्टिफाइड ऑरगॅनिक ग्रेड-1" असे लेबल लावून त्याचप्रमाणे प्रमाणीकरण संस्थेचा लोगो लावून मालाची विक्री करण्यास सुरुवात करता येते. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा याचप्रकारे ग्रेड-2 आणि ग्रेड-3 लिहून विक्री करता येते. प्रमाणीकरण झाल्यानंतर इंडिया ऑरगॅनिक हा लोगो लावून मालाची विक्री करता येते, अशी माहिती  दिली.

या कार्यक्रमामध्ये बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्र व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी देशातील हळदीचे निर्यातदार हे सेंद्रीय हळदीची मागणी करत असून त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनीचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर करावी. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तीक स्वरुपात शेतजमिनीचे प्रमाणीकरण करावयाचे असल्यास त्यासाठी वार्षिक सुमारे 15 हजार रुपये खर्च येतो आणि त्यासाठी पुणे येथील नॅचरल ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी (NOKA)  यांची मदत घेता येईल. लहान शेतकऱ्यांसाठी गटाने नोंदणी करणे शक्य असून त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास 200 शेतकऱ्यांसाठी वार्षिक सुमारे 40 हजार  रुपये खर्च होईल. या पद्धतीने सुद्धा शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा म्हणजे भविष्यात त्यांना आपल्या हळदीपासून निर्यातीद्वारे अधिक दाम मिळू शकेल. यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि हळदीचे मोठे शेतकरी यांनी नोंदणीसाठी पुढे यावे तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ही नोंदणी करावी म्हणजे भविष्यात निर्यातीसाठी चांगली संधी प्राप्त होऊ शकेल, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्र व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी केले.

या कार्यक्रमाचे संचलन प्रा. अनिल ओळंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन किसानचे दीपक खेमलापुरे यांनी केले.

******

 

 

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 09 रुग्ण ; तर 08 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  106 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात 09 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 03 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 06 व्यक्ती असे एकूण 09 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 08 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 05 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 07 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 916 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 752 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 106 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 58 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

20 February, 2021

जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 



         हिंगोली,दि.20: येथील जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी, कैलास लांडगे, अनिल चव्हाण यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****