27 November, 2024
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानास 74 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 पासून संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड व परभणी येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव अर्चना ताम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 नोव्हेंबर, 2024 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, हिंगोली व संविधान चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाचे वाचन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच प्रती वर्षाप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृहात संविधान दिन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यु. डी. राजपूत, सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे, आर्थिकदृष्ट्या मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल वर्षा घुगे, नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल सुलोचना ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानवाच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संविधानाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन समतादूत सुरेश पठाडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी 200 ते 250 विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment