30 August, 2018

सुधारित बीज भांडवल योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन


सुधारित बीज भांडवल योजना आणि
 जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.30:  जिल्ह्यातील  सुशिक्षित बेरोजगारांसाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता सुधारित बीज भांडवल कर्ज योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील  अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी सुधारीत बीज भांडवल कर्ज योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता कर्ज प्रकरणे मागविण्यात येत आहेत.
सुधारीत बीज भांडवल योजनेसाठी पात्रता- अर्जदार किमान 7 वी पास असावा, वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे, उमेदवार बेरोजगार असावा, उमेदवाराचे महाराष्ट्रात  15 वर्षे वास्तव्य असावे, तर जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी पात्रता- शिक्षणाची अट नाही, वय 18 वर्षे पूर्ण असावे,  योजनेअंतर्गत उद्योग व सेवा उद्योग (वाहन व हॉटेल सोडून) यासाठी कर्ज मिळू शकते, यंत्र सामुग्रीतील एकूण गुंतवणुक रु. 2 लाखाच्या आत असावे,  ही योजना  1981 च्या गणनेनुसार एक लाख पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात लागू आहे, योजनेखाली उद्योग व सेवा उद्योग तसेच अस्तित्वात असलेल्या लघु उद्योगाच्या वाढीसाठी अर्ज करता येतो.    
संबंधित सुशिक्षित बेरोजगारांनी दिनांक 30सप्टेंबर 2018 पर्यंत आपले अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,एस-12, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत दाखल करावेत असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. 
000000

No comments: