विशेष जिल्हा युवा पुरस्काराकरिता युवा
आणि महिला मंडळांनी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.10:
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरु युवा
केंद्र, हिंगोली कार्यालयाद्वारा जिल्ह्यातील नोंदणीकृत युवा/महिला मंडळांकडून विशेष
जिल्हा युवा पुरस्कार 2017-18 अशा जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत
आहेत.
या
पुरस्काराचे स्वरुप रु. 25 हजार व प्रमाणपत्र असे आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या
युवा मंडळाचा प्रस्तावाचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. सामाजिक, शैक्षणिक,
सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, रक्तदान शिबीर, पर्यावरणरक्षण व राष्ट्रीय अशा विविध विकासात्मक
कार्यक्रम राबविणाऱ्या युवा / महिला मंडळांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज दिनांक
20 ऑगस्ट 2018 पर्यंत नेहरु युवा केंद्र, दिपक ज्योती मेडीकल एजन्सीच्या वर, दुसरा
मजला रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक,
नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment