मराठा समाजाने निदर्शने व ठिय्या आंदोलने मागे घ्यावीत
-- डॉ. पुरुषोत्तम भापकर
हिंगोली,दि.6: मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता मराठा क्रांती मोर्चाच्या
वतीने मराठवाडा विभागात विविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने तसेच ठिय्या आंदोलने सुरु
असून सदर निदर्शने तसेच ठिय्या आंदोलने मागे घ्यावीत असे शासनाच्या वतीने विभागीय
आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी विनंती केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणे बाबत रविवार दि. 5 ऑगस्ट रोजी मा.
मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेशी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनी तसेच इतर
वृत्त वाहिन्यावरुन संवाद साधला आहे. सदर संवाद हा महाराष्ट्र शासनाच्या
‘महान्यूज’ या संकेतस्थळावर उपलब्ध असून यात मराठा समाजाच्या विविध मागण्या
मान्यतेच्या अनुषंगाने शासानाची भूमिका सविस्तररित्या स्पष्ट करण्यात आली असल्याचे
विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment