डॉ.बाबासाहेब
आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि
डॉ. एस.आर. रंगनाथन
उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता
व सेवक ग्रंथमित्र
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.28: महाराष्ट्र शासनाच्या उच्च् व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत
ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास
व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी
प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक
यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून
डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात
येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ,ब,क,ड
वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 50 हजार, 30 हजार,
20 हजार, 10 हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यस्तरीय
प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये 25 हजार रोख, शाल,श्रीफळ
आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता
व सेवक यांना प्रत्येकी रुपये 15 हजार रोख रक्कम,शाल,श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात
येते.
सन 2018-19 च्या पुरस्कार योजनेत सहभागी
होण्यासाठी ग्रंथालय,कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दिनांक
28 सप्टेंबर 2018 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी या
कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन सुभाष राठोड, प्र. ग्रंथालय संचालक महाराष्ट्र
राज्य मुंबई यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment