पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ‘युवा माहिती दूत’
उपक्रमाचा शुभारंभ
हिंगोली,दि.15: माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त
विद्यमाने राज्यात ‘युवा माहिती दूत’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. आज
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण
कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी ‘युवा माहिती दूत’
बोधचिन्हाचे अनावरण करुन या उपक्रमाचा शुभारंभ केला.
शासनाच्या विकास योजनांची माहिती ग्रामीण आणि दूर्गम भागातील
लाभार्थ्यांना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. ‘युवा माहिती दूत’
त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधुन शासकीय योजनांची माहिती
देणार आहेत. युवा माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲपवर
ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. प्ले स्टोअर वरुन हे ॲप
डाऊनलोड करुन ‘युवा माहिती दूत’ म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती
दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणाऱ्या
पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत. 15 ऑगस्ट नंतर
सहा महिन्याच्या कालावधीत माहिती दूतांनी 50 कुटूंबाशी समक्ष संपर्क साधून त्यांना
विकास योजनांची माहिती द्यावयाची आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या ॲपवर कुटूंबाशी भेट
दिलेल्या बाबतची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक निवडला
जाणार आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यातील 6
हजारापेक्षा जास्त महाविद्यालयातील
सुमारे 23 लाख पेक्षा जास्त शिक्षण
घेणाऱ्या युवक-युवती मार्फत शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यां पर्यंत
पोहचविण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली हे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर
म्हणून काम पाहणार आहेत.
जिल्ह्यातील युवक-युवतीनी ‘युवा माहिती दूत’ म्हणून उपक्रमात
सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment