29 March, 2019

जिल्ह्यात 16 ते 18 व 23 ऑक्टोबर रोजी मद्य विक्रीस मनाई


जिल्ह्यात 16 ते 18 व 23 ऑक्टोबर रोजी मद्य विक्रीस मनाई

हिंगोली, दि.29: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 साठी दिनांक दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान व दिनांक 23 मे, 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदान व मतमोजणीच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये तसेच अनुचित प्रकार घडु नये या करीता मुंबई मद्य निषेध कायदा, 1949 चे कलम 142(1) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी दिनांक 16 एप्रिल (सायंकाळी 5.30 नंतर), दिनांक 17, 18 एप्रिल 2019 व 23 मे 2019 रोजी संपूर्ण दिवस संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्रीसाठी मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले आहेत.
****


15-हिंगोली लोकसभा निवडणूकीत आता 28 उमेदवार


15-हिंगोली लोकसभा निवडणूकीत आता 28 उमेदवार

हिंगोली,दि.29: 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या 34 पैकी 6 उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी आपली  नामनिर्देशन पत्र मागे घेतली आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघ निवडणूकीत आता 28 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.
निवडणूकीतील उमेदवारांचे नाव
1
डॉ. धनवे दत्ता मारोती
2
वानखेडे सुभाष बापुराव
3
हेमंत पाटील
4
अलताफ अहमद एकबाल अहमद
5
असद खॉन महमद खॉन
6
उत्तम भगाजी कांबळे
7
उत्तम मारोती धाबे
8
मोहन फत्तुसिंग राठोड
9
वर्षा शिवाजीराव देवसरकर
10
सुभाष नागोराव वानखेडे
11
सुभाष परसराम वानखेडे
12
अ.कदीर मस्तान सय्यद
13
कांबळे त्रिशला मिलींद
14
गजानन हरिभाऊ भालेराव
15
जयवंता विश्वंभर वानोळे
16
देवजी गंगाराम आसोले
17
प. सत्तार खाँ कासिम खाँ
18
प्रकाश विठ्ठलराव घुन्नर
19
मकबुल अहेमद अब्दुल हबीब
20
ॲङ मारोतराव कान्होबाराव हुक्के
21
वसंत किसन पाईकराव
22
सुनिल दशरथ इंगोले
23
सुभाष काशीबा वानखेडे
24
सुभाष मारोती वानखेडे
25
सुभाष विठ्ठल वानखेडे
26
संतोष मारोती बोईनवाड
27
संदीपभाऊ निखाते
28
संदेश रामचंद्र चव्हाण





नामनिर्देशन मागे घेतलेले उमेदवार
1
इंगोले पिराजी गंगाराम
2
चक्रधर पांडुरंग देवसरकर
3
ढोले विठ्ठल नागोराव
4
डॉ. मनिष वडजे
5
ॲङ शिवाजीराव जाधव
6
ॲङ गंगाधर रामराव सावते

****


राजकीय पक्षानी आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे - निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर





राजकीय पक्षानी आदर्श आचार संहितेची काटेकोर
अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे
- निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर

            हिंगोली,दि.29: मा.भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता 15-हिंगोली मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून, दूसऱ्या टप्प्यात दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होत आहे. याकरीता आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक डॉ. जे. रवीशंकर यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या बैठकीत श्री. रवीशंकर हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव,  विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनीधी उपस्थित होते.   
यावेळी श्री. रवीशंकर म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15-हिंगोली लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. त्यानुसार, दिनांक 19 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार दिनांक 26 मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक होती. तसेच दिनांक 29 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. आजापासून सर्व उमेदवारांच्या खर्चाची नोंद घेतली जाणार असून, आयोगाच्या निर्देशनानुसार खर्चाचा हिशोब ठेवावा. खर्च निवडणूक निरीक्षक सर्व उमेदवरांच्या तीन वेळा खर्च नोंदवही तपासणार आहेत. 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. 1 हजार 989 आणि 8 सहाय्यकारी मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले. तसेच निवडणूक कालावधीत उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी आयोगाचे ‘सुविधा’ हे संकेतस्थाळ सुरु केले असून याद्वारे सर्व परवानगी ऑनलाईन मिळू शकणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे यंत्राची यापूर्वीच सर्व मतदान केंद्रस्तरावर आणि बुथ लेवल एजंट यांना प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले आहे. तसेच उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात देखील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र प्रात्यक्षीकासाठी ठेवले जाणार आहे. सदर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रथमस्तरीय रॅन्डोमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया 24 मार्च रोजी पार पडली असून, दूसरी रॅन्डोमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया ही 31 मार्च रोजी पार पडणार आहे. सदर प्रक्रियेस सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनीधीनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी श्री. जयवंशी यांनी केले.
 तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजेपूर्वी  मॉक पोल (मतदान) घेतले जाते. सदर मॉक पोल (मतदान) घेतल्यानंतर सदर मतदान  काढून (सीआरसी) डिलीट केले असल्याची बूथ लेवल एजंट यांनी खात्री करुन घ्यावी. मॉक पोल झाल्यानंतर व्हीव्हीपॅट मधील सर्व चीठ (पावत्या) काढून त्या सिलबंद पाकीटात ठेवून, नंतर व्हीव्हीपॅट यंत्र सिलबंद केल्याची ही खाली बूथ लेवल एजंटानी करावी. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियावर जाहिरत प्रसारीत करण्यापूर्वी सदर जाहिराती एम.सी.एम.सी. समितीकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच हि निवडणूक सर्वसमावेशक होणार असून, मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच मतदार संघातील सेक्टर निहाय दिव्यांग मतदारासाठी व्हील चेअर तसेच वृध्द आणि गर्भवती स्त्रियांसाठी वाहनांची व्यवस्था आणि उन्हाचा त्रास होऊ नये याकरीता शेडसह बसण्याची व्यवस्‍था प्रत्‍येक मतदान केंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक विषयक काही मदत किंवा माहिती हवी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती ही श्री. जयवंशी यांनी यावेळी दिली.
****

शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्ह्यातील सर्व शाखा सुरु राहणार




शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी 31 मार्च
रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्ह्यातील सर्व शाखा सुरु राहणार

हिंगोली, दि.29:महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक मधील नियम क्रमांक 409 अन्वये दिनांक 31 मार्च, 2019 रोजी शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने सदर दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या शाखा हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव व स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा औंढा नागनाथ दिनांक 31 मार्च, 2019 रोजी उशिरा रात्री 23.00 वाजे पर्यंतचे शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी चालू ठेवावीत. तसेच दिनांक 30 मार्च, 2019 रोजी रात्री उशिरा 23.00 वाजेपर्यंत शासनाचे रोखीच व्यवहार पूर्ण करण्यासाठीचे आदेश रद्द समजण्यात यावेत, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

28 March, 2019

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

        हिंगोली,दि.28: लोकसभा निवडणुक संबंधाने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झालेली असून निवडणुक संबंधाने नामनिर्देशन पत्र दाखल करणे व प्रचारसभा, प्रचार फेरी सुरु होत आहे.हिंगोली जिल्ह्यामध्ये पो.स्टे. औंढा ना. येथे मौ. वाळकी येथे दिनांक 29 व 30 मार्च पर्यंत कालिकानाथ  यात्रा भरणार आहे. दिनांक 6 एप्रिल रोजी गुढीपाडवा हा सण हिंदु समाज नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. दि. 6 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे .
            अशा सर्व विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 27 मार्च 2019 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 10 एप्रिल, 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****




हिंगोली लोकसभा मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ यांची नियुक्ती

हिंगोली लोकसभा मतदारसंघाकरीता निवडणूक
खर्च निरीक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ यांची नियुक्ती

हिंगोली,दि.28: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता एस.एम. सुरेंद्रनाथ यांची निवडणुक खर्च निरीक्षक म्हणुन नियुक्ती केली असून आज त्यांचे आगमन झाले आहे.
निवडणूक निरिक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9022063340 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत एस.एम. सुरेंद्रनाथ यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, हिंगोली, जि. हिंगोली येथे असणार आहे. जिल्हा परिषदेचे गणेश वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.) भ्रमणध्वनी क्रमांक 9923040733 यांची निवडणुक निरीक्षक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.) यांचे संपर्क अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे. 

****

अवैधरित्या मद्याची वाहतुक, साठवणुक, विक्री करणाऱ्याची माहिती देण्याचे आवाहन


अवैधरित्या मद्याची वाहतुक, साठवणुक, विक्री
करणाऱ्याची माहिती देण्याचे आवाहन

हिंगोली, दि.28: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 ची आचारसंहिता लागू झाली असून, या निवडणूक शांततेत खुल्या व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन लक्ष्य ठेवून आहे. निवडणूकीत मतदारावर मद्याच्या प्रलोभनाचा परिणाम होणार नाही म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी जर कोणी अवैधरित्या मद्याची (दारु) निर्मिती, वाहतुक, साठवणुक, विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास जवळच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे तसेच जवळच्या पोलीस स्टेशनकडे माहिती द्यावी. अथवा पुढील क्रमांकावर साधवा पोलीस-26126296, 26122880, 26122230, राज्य उत्पादन शुल्क विभाग दूरध्वनी क्रमांक 02456-220106, राज्य उत्पादन शुल्क विभाग व्हॉट्स ॲप क्रमांक 9158044625 आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग टोल फ्री क्रमांक 9158042489 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन  अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली यांनी केले आहे.

****



नेत्र तपासणी मेळाव्याचे आयोजन


नेत्र तपासणी मेळाव्याचे आयोजन

          हिंगोली, दि.28: जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिकांना व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्यासाठी दिनांक 2 एप्रिल, 2019 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत नेत्र तपासणी मेळाव्याचे आयोजन ECHS दवाखाना, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. याचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****

27 March, 2019

15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाकरीता 34 नामनिर्देशन पत्र वैध तर 8 अवैध



15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाकरीता 34 नामनिर्देशन पत्र वैध तर 8 अवैध

हिंगोली,दि.27: 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता आज नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. यामध्ये 34  जणांचे नामनिर्देशन पत्र वैध तर 8 जणांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आली असून, त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

अ. क्र.
वैध नामनिर्देशन पत्र असलेले उमेदवारांचे नाव
1
डॉ.धनवे दत्ता मारोती
2
वानखेडे सुभाष बापुराव
3
अलताफ अहमद एकबाल अहमद
4
असद खॉन महमद खॉन
5
उत्तम भगाजी कांबळे
6
उत्तम मारोती धाबे
7
चक्रधर पांडुरंग देवसरकर
8
पाटील हेमंत श्रीराम
9
मकबुल अहेमद अब्दुल हबीब
10
मोहन फत्तुसिंग राठोड
11
वर्षा शिवाजी देवसरकर
12
सुभाष नागोराव वानखेडे
13
सुभाष परसराम वानखेडे
14
अ.कदीर मस्तान सय्यद
15
इंगोले पिराजी गंगाराम
16
कांबळे त्रिशला मिलींद
17
गंगाधर रामराव सावते
18
गजानन हरिभाऊ भालेराव
19
जयवंता विश्वंभर वानोळे
20
जाधव शिवाजी मुंजाजीराव
21
ढोले विठठल नागोराव
22
देवजी गंगाराम आसोले
23
पठाण सत्तार खाँ कासिम खाँ
24
प्रकाश विठ्ठलराव घुन्नर
25
मनिष दत्तात्राय वडजे
26
मारोतराव कान्होबाराव हुक्के
27
वसंत किसन पाईकराव
28
संतोष मारोती बोईनवाड
29
संदीप विजयराव निखाते
30
संदेश रामचंद्र चव्हाण
31
सुनिल दशरथ इंगोले
32
सुभाष काशीबा वानखेडे
33
सुभाष मारोती वानखेडे
34
सुभाष विठ्ठल वानखेडे


अ.क्र.
अवैध नामनिर्देशन पत्र असलेले उमेदवारांचे नाव
1
चाऊस शेख जाकेर शेख महुमद
2
नारायण रामा पाटील
3
मस्के कोंडीबा गौनाजी
4
राजश्री हेमंत पाटील
5
गंगाधर दादाजी बलकी
6
आबासाहेब विठ्ठल कल्याणकर
7
चव्हाण बाबु धनू
8
नारायण तुकाराम इरबतनवाड

****