हिंगोली,दि.22: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची आदर्श आचार संहिता 10 मार्च पासून
लागू झाली असून, येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा माहिती कार्यालयात
15-हिंगोली लोकसभा निवडणूक-2019 करीता सुरु करण्यात आलेल्या प्रसार माध्यम
केंद्राचे उद्घाटन आज अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांच्या हस्ते करण्यात
आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, जिल्हा माहिती अधिकारी अरुण
सुर्यवंशी, हिंगाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह पत्रकार
अरुणा होकर्णे, नंदकुमार तोष्णीवाल, योगेश पाटील, विजय गुंडेकर, पिंटू नागरे,
मकरंद बांगर, रमेश चेंडके, श्री. कांबळे आदींची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment