निवडणूक निरीक्षक डॉ. जे. रवीशंकर
यांचे आगमन
हिंगोली,दि.27: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या
अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता कर्नाटक
शासनाच्या गृहनिर्माण विभागाचे सचिव डॉ. जे. रवीशंकर (आय.ए.एस.) यांची निवडणुक
निरीक्षक (सामान्य) म्हणुन नियुक्ती केली असून, आज त्यांचे हिंगोली येथे आगमन झाले
आहे.
निवडणूक
निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9022061167 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत श्री. रवीशंकर यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह,
हिंगोली, जि. हिंगोली येथे असणार आहे. निवडणूक निरीक्षक यांना जिल्हाधिकारी
कार्यालयात सकाळी 10 ते 11 वाजता या कालावधीत भेटता येणार आहे.
निवडणुक
निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणुन उप विभागीय वन अधिकारी केशव वाबळे भ्रमणध्वनी
क्रमांक 7588154078 यांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले
आहे.
****
No comments:
Post a Comment