15-हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक
खर्च निरीक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ यांची नियुक्ती
हिंगोली,दि.19: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने
15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता एस.एम. सुरेंद्रनाथ यांची निवडणुक खर्च
निरीक्षक म्हणुन नियुक्ती केली असून आज त्यांचे आगमन झाले आहे.
निवडणूक निरिक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9445955056 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत एस.एम. सुरेंद्रनाथ यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, हिंगोली, जि. हिंगोली येथे असणार
आहे. जिल्हा परिषदेचे गणेश वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.) यांची निवडणुक
निरीक्षक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.) यांचे संपर्क अधिकारी म्हणुन
नियुक्ती करण्यात आली आहे. असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment