अवैधरित्या
मद्याची वाहतुक, साठवणुक, विक्री
करणाऱ्याची
माहिती देण्याचे आवाहन
हिंगोली, दि.28: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 ची आचारसंहिता लागू झाली असून, या निवडणूक
शांततेत खुल्या व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन लक्ष्य ठेवून आहे.
निवडणूकीत मतदारावर मद्याच्या प्रलोभनाचा परिणाम होणार नाही म्हणून हिंगोली
जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी जर कोणी अवैधरित्या मद्याची (दारु)
निर्मिती, वाहतुक, साठवणुक, विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास जवळच्या राज्य
उत्पादन शुल्क कार्यालयाकडे तसेच जवळच्या पोलीस स्टेशनकडे माहिती द्यावी. अथवा
पुढील क्रमांकावर साधवा पोलीस-26126296, 26122880, 26122230, राज्य उत्पादन शुल्क
विभाग दूरध्वनी क्रमांक 02456-220106, राज्य उत्पादन शुल्क विभाग व्हॉट्स ॲप
क्रमांक 9158044625 आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग टोल फ्री क्रमांक 9158042489 या
क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक,राज्य
उत्पादन शुल्क, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment