हिंगोली, दि. 29 : महाराष्ट्र शासन कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद या कार्यालयामार्फत दिनांक
01 नोव्हेंबर, 2020 ते दिनांक 07 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत पंडित दीनदयाळ
उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी
जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय आटो पार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो
इंडस्ट्रीज लि. औरंगाबाद, चौगुले इंडस्टीज प्रा.लि. पुणे, महावितरण कार्यालय,
औरंगाबाद, मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन,
सेक्युरिटी ॲण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडिया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स,
हिंगोली. विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स,
उस्मानाबाद, धूत टान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी
बेअरिंग औरंगाबाद, ॲसेंसीव्ह एज्युकेशन लि. पुणे व श्री साई रिसर्च लॅब इत्यादी
नामांकित उद्योजकांनी एक हजार 902 रिक्त पदे ऑनलाईन भरण्यासाठी मागणी नोंदविली आहे
.
या रिक्त पदासाठी एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., पदवीधर,
डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एम.बी.ए. इत्यादी पात्रता धारण केलेल्या
उमेदवारांनी लाभ घ्यावा. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील
रिक्तपदांना आपल्या एम्पलॉमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने
लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे. ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अप्लाय
करावे.
याबाबत काही अडचण आल्यास 9860015383, 9623020934, 7385924589 या
भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. तसेच रिक्त पदांची माहिती दररोज अद्यायावत करण्यात येते. उमेदवारांनी
रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, औरंगाबादचे उपायुक्त अ.भि.पवार, कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोलीचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे
यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment