सध्या
खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारीची काढणी सुरु आहे. या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी
सर्व शेतकरी बांधवांनी आवश्यक ती काढणी व मळणीचे कामे पूर्ण करुन घ्यावीत. या कामी
वेळ लागत असल्यास कापणी केलेल्या सोयाबीनची गंजी उंचीच्या ठिकाणी ताडपत्रीने झाकून
ठेवण्याची व्यवस्था करावी. जेणेकरुन सोयाबीन पाण्याच्या संपर्कात येणार नाही व होणारे
नुकसान टळेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment