हिंगोली, दि. 6 : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी माहे ऑक्टोबर 2020 ची मासिक वेतन देयके दाखल करताना माहे सप्टेंबर 2020 अखेरचे ई आर -1 त्रैमासिक विवरणपत्र जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्विकारले जाणार नाहीत. त्यासाठी ईआर-1 हे विवरणपत्र भरावयाची मुदत दि. 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत असून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन भरुन त्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र काढून घ्यावेत.
तसेच सर्व कार्यालयांनी आपले
ईमेल पत्ता, फोन नंबर, कार्यालयाचा पत्ता, टॅन क्रमांक, पॅन क्रमांक अद्ययावत करुन
घ्यावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी
केले आहे.
0000
No comments:
Post a Comment