हिंगोली दि. 13 : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात
आणण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या
मोहिमेंतर्गत 02 लाख 36 हजार 716 कुटुंबाचे सर्वेक्षण करुन शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण
करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.
कोविडमुक्त
महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम दोन
टप्प्यात राबविण्यात येणार आहे. याचा पहिला टप्पा दि. 15 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर,
2020 असा असून तो पूर्ण झाला आहे. तर दुसरा टप्पा दि. 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर,
2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात
पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वीपणे
राबविण्यात आली आहे. या मोहिमेत शहरी भागातील 42 हजार 979 आणि ग्रामीण भागातील 1 लाख
93 हजार 737 कुटुंबे असे एकूण 2 लाख 36 हजार 716 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात
आले आहे. जिल्ह्यात शहरी भागातील लोकसंख्या 2 लाख 18 हजार 954 एवढी आहे. तर ग्रामीण
भागातील लोकसंख्या 9 लाख 98 हजार 504 एवढी असून शहरी व ग्रामीण मिळून 12 लाख 17 हजार
458 एवढी जिल्ह्याची लोकसंख्या आहे.
या
सर्वेक्षणामध्ये सारीचे 42 रुग्ण, आयएलआयचे 283 रुग्ण आणि कोविडचे 198 पॉझिटिव्ह रुग्ण
आढळून आले आहेत. या सर्वांना पुढील उपचारासाठी फेवर क्लिनिकमध्ये संदर्भीत करण्यात
आले आहेत. तसेच कोमार्बीड (मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, लठ्ठपणा, किडनी आजार, लिव्हर
आदी) आजाराचे 46 हजार 170 व्यक्ती आढळून आले आहेत.
या
मोहिमेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने 595 पथके स्थापन करुन यामध्ये
एक हजार 785 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना बॅच, कॅप,
टीर्शट देण्यात आले आहे. तसेच संदर्भ सेवेसाठी 37 वैद्यकीय अधिकारी, 29 रुग्णवाहिका
आणि 30 फेवर क्लिनिकची व्यवस्था करण्यात आली आहे.
या
मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागामार्फत गावोगावी जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी
करुन त्यांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर माहिती पुस्तिका, फोल्डर,
चित्ररथ, स्टीकर्सच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment