हिंगोली,दि. 6 :
जिल्ह्यात 15 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या
अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 08 व्यक्ती, औंढा परिसरात 03
व्यक्ती व कळमनुरी परिसरात 02 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01
व्यक्ती व कळमनुरी परिसर 01 व्यक्ती असे एकूण 15 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले
आहेत. तर आज 35 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर आज दोन कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा
सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 32
रुग्णांची प्रकृती गंभीर
असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 09 रुग्णांची प्रकृती
अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 41 रुग्णांची
सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु
आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत
कोविड-19 चे एकूण 2 हजार 774 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 511 रुग्ण बरे
झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 221
रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 42 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment