हिंगोली, दि.16 : राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबतचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी, ट्रांसजेंडर हा समाज दुर्लक्षित घटक आहे.
या समाज
घटकाचा सर्वांगीण विकास एवम उन्नती व्हावी, त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले
जावे यासाठी हिंगोली जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण,
जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे चिरागशहा बाबा दर्गाह रोड, रिसालाबाजार, हिंगोली
यांच्या कार्यालयात दिनांक 24 ऑक्टोबर, 2020 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन
गिता गुठ्ठे, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment