जनतेनी
सहकार्य करण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन
हिंगोली,
(जिमाका) दि. 07 : जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनातर्फे
आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य,
मुंबई आणि जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी वेळोवेळी निर्देश / आदेश जारी केलेले आहेत.
त्याअनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती व इतर
कामकाज नियंत्रित करण्यात आले आहे. तरीही गर्दी रोखणे शक्य होत नाही. गर्दी
नियंत्रणासाठी पुरेसे मनुष्यबळ कार्यालयात उपलब्ध नाही. कार्यालयात कर्मचारी व
अधिकारी यांची संख्या अतिशय तोकडी असल्याने कोरोनापासून त्यांचा बचाव न झाल्यास
भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दिर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता संभवते.
या कारणाने हिंगोली जिल्ह्यातील शिकाऊ अनुज्ञप्ती यांच्या
अपॉईटमेंटचा प्रतिक्षा कालावधी एका महिन्यावर गेल्याने लोकांना अडचणीचा सामना करावा
लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांची सोय व्हावी म्हणून तसेच
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 8 एप्रिल, 2021 पासून शिकाऊ अनुज्ञप्ती
चाचणी, पक्की अनुज्ञप्ती चाचणी ही कामे विहीत क्षमतेपेक्षा 25 टक्के इतक्या संख्येने
नियमितपणे सुरु राहतील. तसेच इतर कार्यालयीन कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या
उपस्थितीप्रमाणे करण्यात येईल. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज
नेहमीप्रमाणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे गर्दी न करता चालू
राहील. केंद्र शासनाने वाहन विषयक, अनुज्ञप्ती विषयक कागदपत्राची वैधता दि. 30
जुन, 2021 पर्यंत वाढविलेली आहे. याची सर्वांनी नोंद घेवून विनाकारण कार्यालयात
गर्दी करु नये.
अर्जदारानी प्रत्येक कामासाठी घेतलेल्या अपॉईटमेंटच्या निर्धारीत
वेळेत मास्क, हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर इत्यादीसह उपस्थित राहावे. सर्वांनी सोशल
डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच शासन आदेशाप्रमाणे अभ्यांगतांना
कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष भेटण्याची परवानगी देण्यात येणार
नाही. आपल्या कोणत्याही कामासाठी, चौकशीसाठी आपण mh38@mahatranscom.in आणि dyrto.38-mh@gov.in ई-मेलवर संपर्क साधावा.
उक्त बाबीची सर्व अर्जदारांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****
No comments:
Post a Comment