हिंगोली,
(जिमाका) दि. 08 : जिल्ह्यात कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स, बियर व
वाईन बार, बियर व वाईन दुकाने (शॉपी) आणि देशी दारु दुकाने दि. 30 एप्रिल, 2021
पर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे
अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
या आदेशाचे पालन न
करणाऱ्या संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय
दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार
तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये
दंडनीय , कायदेशीर कारवाई संबंधित अधिकारी व
पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment