महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
हिंगोली,(जिमाका)दि.29: कोरानाचा प्रादूर्भाव खंडीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा
61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना सामान्य
प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत निर्गमित करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या
अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाने विषाणूचा
प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिनांक 13 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये
दिनांक 1 मे, 2021 च्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू
केले असुन खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8.00 वाजता
फक्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे,
नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था
करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर
सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात
यावे.
तसेच वरील नमूद ठिकाणी
केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर,
नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त,
आयुक्त, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे, इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात
येऊ नये. कवायती, संचलन आयोजन करण्यात येऊ नये. विधीमंडळ, मा. उच्च न्यायालय व इतर
संविधानिक कार्यालयामध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.
ध्वजारोहण करणारे पालकमंत्री महोदय काही अपरिहार्य
कारणांमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयी विभागीय
आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यानी ध्वजारोहण करावे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोव्हिड-19 च्या
अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे,
सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी.
****
No comments:
Post a Comment