हिंगोली, (जिमाका) दि. 06 : जिल्हयात
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दि. 5 एप्रिल, 2021 ते दि.30
एप्रिल, 2021 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
1. कलम 144 आणि रात्रीची कर्फ्यू
लागू करणे.
अ) हिंगोली
जिल्ह्यामध्ये दि. 5 एप्रिल 2021 चे रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते दि.30 एप्रिल 2021चे
रात्री 11.59 पर्यंत
फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत आहे.
ब) या
कालावधीत सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोणत्याही
सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक एकत्र
येण्यास किंवा जमण्यास मनाई करण्यात आली आहे.
क) उर्वरित कालावधीत (सोमवार ते शुक्रवार या दिवशी रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत) वैध कारणाशिवाय किंवा खाली
दिलेल्या परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.
ख) वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली प्रतिबंधित नसतील.
ग)
खालील गोष्टींचा अत्यावश्यक
सेवेमध्ये समावेश असेल-
रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मेसियां, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य
सेवा.
किराणा सामान, भाजीपाला दुकाने, दुग्धशाळा, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने. सार्वजनिक परिवहन- ट्रेन, गाड्या, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस. स्थानिक
प्राधिकरणांकडून किंवा शासनाकडून मान्सूनपूर्व कामे. स्थानिकप्राधिकरणाव्दारे
देणेत येणा-या सर्व सार्वजनिक सेवा. वस्तूंची वाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई-
कॉमर्स, अधिकृत मिडिया, पेट्रोल पंप. पेट्रोलियम पदार्थ, सर्व कार्गो,
डाक सेवा, डाटा सेंटर, Cloud service providers /
IT srevices supporting critical infrastructure and services, शासकीय व खाजगी
security services, फळ विक्रेते. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा यांचा
समावेश आहे.
2. बाहेरील /
सार्वजनिक ठिकाणच्या क्रिया :
अ) सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 8ते सकाळी 7 पर्यंतआणि शुक्रवारी सायंकाळी
8.00 ते सोमवार सकाळी 7.00 पर्यंत सर्व उद्याने,
सार्वजनिक मैदान बंद राहतील.
ब) सोमवारी ते शुक्रवार सकाळी 7.00 ते सायंकाळी 8.00 या दरम्यान, सर्व नागरिकांनी बाहेरील व सार्वजनिक
ठिकाणी वावरताना कोरोना नियमांचे योग्य व काटेकोरपणे पालन करावे.
क) स्थानिक अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी बारकाईने निरीक्षण केले पाहिजे आणि अशा ठिकाणी गर्दी झाल्यास स्थानिक अधिकाऱ्यांना असे वाटते की या ठिकाणी अभ्यागतांचे वर्तन शिस्तबद्ध
नाही आणि कोव्हीड-19 विषाणूचा प्रसार होऊ
शकतो. अशी ठिकाणे तात्काळ बंद करण्याची कारवाई करण्यात यावी.
3. दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स :
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मार्केट आणि मॉल्स पूर्ण दिवसभर बंद राहतील.
अत्यावश्यक सेवा दुकाने सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत चालू राहतील.
अ) अत्यावश्यक सेवा दुकान परिसरातील ग्राहकांमधील सामाजिक अंतर सुनिश्चित ठेवावे.
जास्त ग्राहक आल्यास ग्राहकांना शक्य तेथे
चिन्हांकित करुन पुरेसे सामाजिक अंतर देऊन थांबवावे.
ब)
केंद्र शासनाच्या निकषानुसार अत्यावश्यक दुकानांचे मालक आणि सर्व दुकानांवर काम करणाऱ्या व्यक्तीनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावेत. सर्व दुकान
मालकांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पारदर्शक काचेच्या किंवा इतर साहित्याच्या वापर करावा तसेच इलेक्ट्रॉनिक पेमेंट यासारख्या सुरक्षा उपायांचे पालन करण्यात यावे.
क) आत्तासाठी बंद असलेल्या सर्व
दुकान मालकांना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व लोकांना केंद्र
शासनाच्या निकषानुसार लसीकरण करण्यास तसेच पारदर्शक
काच किंवा इतर साहित्याचा ग्राहकांशी सुसंवाद करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादी सारख्या उपाययोजना कराव्यात. जेणेकरुन
सरकार कोणतीही भीती न बाळगता हे पुन्हा सुरु करण्यास पसंती दर्शवील.
4. सार्वजनिक वाहतूक :
पुढील प्रतिबंधांसह सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे कार्यान्वित होईल
ऑटो रिक्षा |
ड्रायव्हर + 2 प्रवासी |
टॅक्सी (चारचाकी) |
ड्रायव्हर + 50% वाहन क्षमता आरटीओनुसार |
बस |
आसन क्षमता- आरटीओचे नियमानुसार तथापि,
बसमध्ये
उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परवानगी नाही. |
अ) सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्कचा अनिवार्यपणे वापर
करणे आवश्यक आहे. विनामास्क आढळल्यास अपराधींना 500 रुपये दंड आकारला जाईल.
ब) चारचाकी टॅक्सीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने मास्क घातला नसेल तर, नियमांचे उल्लंघन करणारा
प्रवासी
आणि चालक हे प्रत्येकी रक्कम रुपये 500/- दंडास पात्र
राहतील.
क) सर्व वाहने प्रत्येक फेरीनंतर सॅनिटाइझरव्दारे
स्वच्छ करणे बंधनकारक आहे.
ड) सर्व सार्वजनिक वाहतूक- केंद्र शासनाच्या निकषानुसार जनतेच्या संपर्कात येणारे वाहनचालक आणि
इतर कर्मचारी यांनी लवकरात लवकर लसीकरण करावे. आणि जोपर्यंत
लसीकरण पूर्णपणे होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तींनी आपल्या बरोबर 15 दिवसांपर्यंत वैध असणारे नकारात्मक कोरोना निकाल प्रमाणपत्र
ठेवणे
बंधनकारक आहे. हा नियम 10 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल. तसेच टॅक्सी आणि ऑटोसाठी, ड्रायव्हर प्लास्टिकच्या
शीटद्वारे स्वत:ला अलग ठेवत असल्यास त्याला या अटीतून सूट मिळू शकते.
ई) वरील पैकी कोणीही लस घेतल्याशिवाय किंवा RTPCR नकारात्मक प्रमाणपत्र न ठेवल्याचे आढळल्यास एक हजार रुपये
दंड आकारला जाईल.
फ) बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत, सामान्य डब्यात उभे राहुन
प्रवास करणारे प्रवासी आणि सर्व प्रवाशांनी मास्कचा वापर केलेला आहे किंवा नाही याची खात्री
रेल्वे अधिकारी यांनी करावी.
जी) सर्व गाड्यांमध्ये मास्क न
वापरणाऱ्या प्रवासी, चालक, कर्मचारी यांना पाचशे रुपये दंड आकारला जाईल.
एच) जे प्रवासी रेल्वे, बस याद्वारे
रात्री 8.00 ते सकाळी 7.00 किंवा शनिवार व
रविवार या कालावधीत ये-जा करीत असतील त्यांना बस स्थानक, रेल्वे स्थानक येथून ये-
जा करण्यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या वैध तिकीटाच्या आधारे परवानगी असेल.
5. कार्यालये :
अ) खालील कार्यालये वगळता सर्व खासगी
कार्यालये बंद राहतील.
सहकारी संस्था, PSU (अंगीकृत सार्वजनिक उपक्रम), खाजगी बँका, चार्टड अकाउंटंट यांची कार्यालये, विद्युत पुरवठा संबंधित कंपन्या आणि कार्यालये, दूरसंचार सेवा देणारे कार्यालये, विमा, मेडिक्लेम कंपन्या, उत्पादन व वितरण व्यवस्थापनासाठी फार्मास्युटिकल कंपनी, कार्यालये, वकिलांचे कार्यालये.
ब) सरकारी कार्यालये 50 टक्के उपस्थितीसह कार्य
करतील.
तसेच कोविड 19 (साथीचा रोग) प्रतिसादासाठी
आवश्यक असणारी कार्यालये,
विभाग कार्यालय प्रमुखाचे निर्णयानुसार ते 100 टक्के सामर्थ्याने कार्य
करतील.
क) वीज, पाणी, बँकिंग आणि इतर वित्तीय सेवेशी निगडीत असलेली सर्व शासकीय कार्यालये तसेच शासकीय कंपन्या पूर्ण क्षमतेसह चालू राहतील,
SEBI बाजार व कार्यालये, STOCK EXCHANGE, RBI अंतर्गत कार्यालये, PAYMENT SYSTEM
OPERATOR, FINANCIAL MARKET PARTICIPANTS
OPERATING IN RBI REGULATED MARKAT, all non banking financial corporations, all
Micro finance Institution, Custom house egents / Licensed Multi model transport
operators associated with movement of vaccines / life saving drugs /
pharmaceutical products.
ड) शासकीय कार्यालये तसेच
सरकारी कंपन्यांच्या बाबतीत त्याच कार्यालयात असलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त
कोणाबरोबरही सर्व सभा शक्यतो ऑनलाईनच आयोजित कराव्यात.
इ) सरकारी कार्यालये तसेच सरकारी कंपन्यांमध्ये कोणत्याही अभ्यागतांना परवानगी
दिली जाणार नाही. याकरिता स्थानिक कार्यालयांनी संपर्क क्रमांक व ई-मेल
प्रसिद्ध करून नागरिकांची कामे करावीत.
फ) शासकीय कार्यालयात प्रवेशासाठी 48 तासांच्या आतील नकारात्मक आरटीपीसीआरअहवाल असणाऱ्या
अभ्यागतांनाच अपवादात्मक परिस्थितीमध्येच शासकीय कार्यालयाचे प्रमुख प्रवेश पास प्रदान करु शकतील.
क) खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही कार्यालयांसाठी, भारत सरकारच्या निकषानुसार लवकरात लवकर
लसीकरण करणे गरजेचे आहे, जेणेकरुन कोविड 19 चा प्रसार किंवा गतीने प्रसार होण्याच्या भीतीशिवाय सरकार तातडीने कार्यालये पुन्हा सुरु करु शकेल.
6. खाजगी वाहतुक व्यवस्था :
खाजगी वाहने तसेच खाजगी बससेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री
8.00 या वेळेमध्ये सुरू राहतील आणि अत्यावश्यक सेवा अथवा निकडीच्या
वेळी उर्वरित कालावधीसाठी म्हणजेच (सोमवार ते शुक्रवार रात्री
8.00 ते सकाळी 7.00 पर्यत आणि शुक्रवार रात्री
8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजेर्पत) सुरु राहतील. खाजगी बसेस यांनी खालील निर्देशांचे
पालन करणे बंधनकारक असेल.
अ)
खाजगी बसेस मधून बसण्याच्या क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करु
शकतील. उभा राहून एकाही प्रवाशाला प्रवास
करण्यास परवानगी असणार नाही.
ब) भारत सरकार मार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार सर्व खाजगी वाहतूक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी
वर्ग जोकी नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. आणि लसीकरण पूर्ण होईपर्यत कोरोनाचे नकारात्मक प्रमाणपत्र 15 दिवसांसाठी वैध असलेले जवळ
बाळगणे आवश्यक राहील. सदरचा नियम
10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.
7. मनोरंजन आणि करमणूक विषयक
:
अ)
सिनेमा हॉल बंद राहतील, नाटयगृहे आणि प्रेक्षागृहे बंद राहतील, मंनोरंजन पार्क, आर्केस्ट्रा, व्हिडीओ गेम्स पार्लरस बंद राहतील, वॉटर पार्क बंद राहतील, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रीडा संकुले बंद राहतील,
ब) भारत सरकारकडील निर्देशानूसार वरील आस्थापनाशी निगडीत व्यक्ती /
कामगारवर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणे करून कोव्हीड-19 विषाणू संसर्गाची भिती नबाळगता, शासनास कार्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
क) चित्रपट, मालिका, जाहिराती यांचे चित्रीकरणास खालील अटीवर परवानगी असेल.
मोठया संख्येने कलाकार एकत्र येतील अशा प्रकारच्या दृश्याचे चित्रिकरण करणे टाळावे, चित्रिकरणाशी निगडीत सर्व कामगार वर्ग, कलाकार या सर्वाना
15 दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे RTPCR निगेटिव्ह
असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. सदरचा नियम 10 एप्रिल,
2021 पासून लागू होईल. कलाकार आणि संबंधित कामगार वर्ग यांच्यासाठी Quarantine Bubble तयार करण्यात आल्यास, सदर Quarantine Bubble मध्ये कोणत्याही संख्येत प्रवेश करण्यापूर्वी कोरोनाचे
RTPCR
निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर स्थानिक
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येईल.
8. रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्स विषयक
:
अ) लॉजिंगच्या आतील आवारामध्ये असलेले रेस्टॉरंट आणि बार चालू राहतील व
उर्वरित सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील.
ब) सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेमध्ये पार्सल सुविधा,
घरपोच सेवा, Take Away सुविधा या सुरू राहतील. शनिवार व रविवार या दिवशी
फक्त घरपोच पार्सल सेवा सकाळी 7.00 ते रात्री
8.00 वाजेपर्यत सुरु राहतील. आणि कोणत्याही नागरिकांस या सेवा घेण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंट आणि बार याठिकाणी
जाता येणार नाही.
क) लॉजिंगमध्ये
राहण्यासाठी आलेल्या प्रवाशांसाठी फक्त त्या लॉजमधील रेस्टॉरंट आणि बार सुरु राहतील. कोणत्याही परिस्थितीत बाहेरील प्रवाशांसाठी या सेवेचा लाभ देता येणार नाही. बाहेरील प्रवाशांसाठी वर नमूद केलेले रेस्टॉरंट आणि बारसाठीचे प्रतिबंधाचे पालन केले जाईल.
ड) भारत सरकारकडील निर्देशानुसार घरपोच
सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, लसीकरण झालेले नसल्यास सर्वानी 15 दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. सदरचा नियम 10 एप्रिल,
2021 पासून लागू होईल.
इ)
RTPCR Test प्रमाणपत्र किंवा लसीकरण केलेले नाही अशा कामगार
वर्गाने घरपोच सेवा दिल्यास त्यांना 10 एप्रिल, 2021 पासून सदर नियमाचा भंग केल्याबद्दल
रक्कम रुपये 1000/- दंड आणि संबंधित आस्थापनेकडून
रक्कम रुपये 10,000/- दंड आकारला जाईल. वारंवार
अशा स्वरुपाचा गुन्हा केल्यास साथरोग अधिसूचना लागू असेपर्यंत परवाना रद्द करण्यात
येईल.
ई) भारत सरकारकडील निर्देशानुसार रेस्टॉरंट आणि बार आस्थापनामध्ये काम करणारे व्यक्ती, कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणे करून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता
शासनास रेस्टॉरंटआणि बार सुरु करण्याबाबत निर्णय घेणे सोईस्कर
होईल.
9. धार्मिक /
प्रार्थनास्थळे :
अ) सर्वधर्मीय धार्मिक / प्रार्थनास्थळे बंद राहतील.
ब) सर्व धार्मिक आणि प्रार्थनास्थळामध्ये
धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारिक आणि धार्मिक सेवा करता येतील. परंतु यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही.
क) भारत सरकारकडील निर्देशानुसार धार्मिक आणि प्रार्थनास्थळामध्ये सेवा देणारे सेवेकरी
यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणे करुन कोव्हीड-19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास धार्मिक / प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत
निर्णय घेणे सोईस्कर होईल.
10. केशकर्तनालय दुकाने / स्पा / सलून /
ब्युटी पार्लरस :
अ) सर्व केशकर्तनालय दुकाने / स्पा /
सलून / ब्युटी पार्लर्स
बंद राहतील.
ब) भारत सरकारकडील निर्देशानुसार सर्व केश कर्तनालय दुकाने /
स्पा / सलून /
ब्युटी पार्लर्समधील कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणे करुन कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास सर्व केश कर्तनालय दुकाने / स्पा / सलून /
ब्युटी पार्लर्स सुरु करण्याबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
11. वृत्तपत्रे संबंधित :
अ) सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरु राहील. ब) वृत्तपत्रांची घरपोच सेवाही आठवडयातील
सर्व दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00
यावेळेमध्ये करता येईल. क) भारत सरकारकडील निर्देशानूसार सर्व
वृत्तपत्रामधील कामगारवर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, वृत्तपत्राची घरपोच सेवा देणाऱ्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी
15 दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे नकारात्मक प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. सदरचा नियम 10 एप्रिल,
2021 पासून लागू होईल.
12. शाळा आणि महाविद्यालये :
अ) सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. ब) वरील नियमामधून
10 वी आणि 12 वीच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना
सुट असेल. परिक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक
आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे किंवा ४८ तासाचे वैध असलेले कोरोनाचे निगेटिव्ह RTPCR Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. क) महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेली परीक्षा जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी कोणताही त्रास होऊ न देता, स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन परिक्षा घेता येतील. ड)
विद्यार्थ्यांना प्रत्येक्ष परीक्षेस उपस्थित राहण्यासाठी प्रवासास परवानगी असेल.
परंतु त्यांना परीक्षा केंद्र व घरी येण्यासाठी रात्री 8.00 नंतर देखील परवानगी
असेल. परंतु त्यांच्याकडे वैध प्रवेश पत्र असणे गरजेचे असेल. इ) सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. फ) भारत सरकारकडील निर्देशानूसार वरील नमूद आस्थापना मधील शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग
यांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड-19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास सर्व शाळा महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.
13. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम :
अ) कोणत्याही प्रकारचे धार्मिक ( यात्रा, जत्रा, उरुस इत्यादी),
सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम
यांना परवानगी नाही.
ब) ज्या जिल्ह्यामध्ये निवडणूका प्रस्तावित
असतील, त्या ठिकाणी राजकीय सभा /
मेळावे घेण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी
यांच्याकडून परवानगी देण्यात येईल.
1. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या
मार्गदर्शक सूचनेनूसार संबंधित राजकीय मेळावे / सभा यांना बंदिस्त सभागृहासाठी 50 पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी राहणार नाही किंवा सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 टक्क्यापेक्षा
जास्त नागरिकांना परवानगी राहणार नाही. यापैकी जे कमी असेल त्या संख्येची परवानगी
देता येईल आणि खुल्या ठिकाणी
200 पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी राहणार नाही किंवा खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50 टक्क्यापेक्षा
जास्त नागरिकांना परवानगी राहणार नाही यास अधीन राहून सर्व कोव्हीड-19 शिष्टाचाराचे पालन केले जाईल, या अटीवर परवानगी देण्यात येईल.
2. संबंधित परवानगी देण्यात आलेल्या राजकीय सभा / मेळावे संबंधित क्षेत्राचे अधिकारी यांच्यामार्फत योग्य नियमांचे पालन केले जात
असल्याची खात्री केली जाईल.
3. सदर ठिकाणी कोव्हीड -19 शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्यास
संबंधित ठिकाणचा जागा मालक हा यासाठी जबाबदार राहील. आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम
2005 नुसार
दंडास पात्र राहील. गंभीर प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर ठिकाण हे कोव्हीड-19
संसर्ग संपेपर्यत बंद राहील.
4. एखाद्या उमेदवारांच्या दोन
पेक्षा जास्त राजकीय सभा आणि मेळाव्यामध्ये सदर बाबींचे उल्लंघन झालेस, पुन्हा सदर उमेदवाराच्या राजकीय सभा / मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही.
5. कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, कोपरा सभा या ठिकाणी कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे
पालन करणे बंधनकारक असेल.
6. वरील सर्व मार्गदर्शक सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वासाठी समान
राहतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या
तक्रारी होणार नाहीत याविषयी दक्षता घेणे.
क) लग्न समारंभास जास्तीत जास्त
50 व्यक्तींच्या उपस्थितीत खालीलप्रमाणे परवानगी असेल.
1. लग्न समारभांमध्ये येणाऱ्या
अभ्यागतांसाठी सेवा देणाऱ्या सर्व कामगार वर्गाचे लसीकरण करणे बंधनकारक असेल आणि जोपर्यत
लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यत वैध निगेटिव्ह
असल्याचे RTPCR Test प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील
2. निगेटिव्ह असल्याचे RTPCR
Test प्रमाणपत्र व लसीकरण केलेले नाही असा सेवा देणारा व्यक्ती निर्दशर्नास
आल्यास त्यास रक्कम रुपये 1000/- दंड आकारला जाईल आणि संबंधित आस्थापना मालकास रक्कम रूपये
10,000/- दंड आकारला जाईल.
3. लग्न समारंभ आयोजित केले
जात असलेल्या हॉलच्या परिसरामध्ये पुन्हा पुन्हा उल्लघंन झाल्यास सदर परिसर हा सिल
केला जाईल, तसेच सदर ठिकाणी दिलेली परवानगी
कोव्हीड-19 अधिसचूना संपेपर्यत रद्द केली
जाईल.
4. हिंगोली जिल्ह्यातील प्रतिबंधित
क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित
क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल
कार्यालय / हॉल / सभागृह, घर व घराच्या
परिसरात 50 लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री,
स्वयंपाकी / वाढपी इ. सह) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे / समारंभाचे
आयोजन करणे कामी संबंधित उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. सदर
आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती
व्यवस्थापनाकडून कोविड-19 साथीचा रोग आटोक्यात आल्याचे जाहीर होत नाही. तोपर्यत
संबंधित मालमत्ता बंद राहील. तसेच कार्यक्रम आयोजकांकडून रक्कम रुपये 10,000/- दंड
व फौजदारी कारवाई करावी.
ड) अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त
20 लोकांना परवानगी असेल. सदर अंत्यविधीचे ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण करावे. सदर कर्मचाऱ्यांस वैध निगेटिव्ह असल्याचे RTPCR Test प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील.
14. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते
:
अ) रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास
देवू नयेत. फक्त पार्सल सेवा व घर पोच
सेवा सकाळी 07.00 वा. ते रात्री
08.00 वा. यावेळेत सर्व दिवशी सुरु ठेवाव्यात.
ब) प्रतिक्षाधीन ग्राहकांना काऊंटर पासून दूर अंतरावर सामाजिक अंतर राखून उभे करावे.
क) सदर आदेशाचा भंग करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यावर साथरोग संपूर्ण संपेपर्यंत
बंद ठेवणेची कार्यवाही करावी.
ड) ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार
लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक RTPCR चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे. त्याची मुदत 15 दिवस असेल. सदर नियम 10 एप्रिल,
2021 पासून लागू होईल. याची जबाबदारी
नगरपालिका हद्दीत मुख्याधिकारी यांची व ग्रामीण भागामध्ये गट विकास अधिकारी
यांच्या देखरेखीखाली ग्रामसेवकांची राहील.
इ) स्थानिक प्रशासनाने सदर विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किंवा सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावे. जे विक्रेते आणि ग्राहक सदर कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयक
नियमांचे उल्लंघन करतील, ते दंडनीय कारवाई पात्र राहतील.
फ) जर विक्रते पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन करत असल्याची स्थानिक प्रशासनाची खात्री
झाल्यास व सदर विक्रेते दंड करुनही नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर निलंबनाची
किंवा साथरोग आटोक्यात येईपर्यंत बंद ठेवण्याची कारवाई करणेत यावी.
15. उत्पादन क्षेत्र :
अ) खालील अटीस अधीन राहून उत्पादन क्षेत्र सुरु राहील.
बी) कारखाने व उत्पादक आस्थापना यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तापमान तपासूनच
प्रवेश द्यावा.
सी) सर्व कर्मचारी–व्यवस्थापन व त्याचप्रमाणे
प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी यांनी भारत सरकाराच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे.
डी) जर एखादा कर्मचारी / मजूर कोविड
पॉझिटीव्ह आढळला तर त्याच्या सोबत निकट संपर्कात आलेल्या इतर कर्मचारी /
मजूर यांना पगारी रजा देवून त्यांचे अलगीकरण करण्यात यावे.
इ) ज्या कारखान्यात / आस्थापनेत
500 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील अशा कारखान्यांनी /
आस्थापनांनी त्यांचे स्वत:चे अलगीकरण केंद्र स्थापन करावेत.
एफ) जर एखादा कर्मचारी कोविड पॉझिटीव्ह आढळल्यास सदर आस्थापनेचे संपूर्ण निर्जंतुकीकरण
पूर्ण होत नाही तोपर्यंत सदर आस्थापना बंद ठेवण्यात यावी.
जी) जेवण व चहाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्यात याव्यात जेणेकरुन गर्दी होणार नाही, तसेच एकत्र बसून जेवण करण्यास मनाई असेल.
एच) सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
आय) औद्योगिक कामगार यांना खाजगी बसेस,
वाहनाद्वारे ओळखपत्र बाळगून रात्री 8.00 ते सकाळी 7.00 व शनिवार / रविवार या
कालावधीत शिफ्टनुसार प्रवास करण्यास मुभा राहील.
जे) सर्व कामगारांचे भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण
होत नाही तोपर्यंत नकारात्मक RTPCR चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे
त्याची मुदत 15 दिवस असेल. सदर नियम 10 एप्रिल,
2021 पासून लागू होईल.
ज) जर एखादा कामगार कोविड पॉझिटीव्ह आल्यास त्याला वैद्यकीय रजा देणेत यावी व त्याला कामावर गैरहजर कारणास्तव कामा
वरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांस पूर्ण पगारी
वेतन देणेत यावे.
झ) कंपनी कर्मचारी
यांना त्यांचे कंपनीचे ओळखपत्रावर कंपनीतील डयुटीसाठी प्रवास अनुज्ञेय राहील.
16. ई-कॉमर्स :
अ) ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार
लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक RTPCR चाचणी प्रमाणपत्र 15 दिवसासाठी वैध राहील असे सोबत बाळगणे बंधनकारक राहील. सदर नियम 10 एप्रिल,
2021 पासून लागू होईल.
ब) या आदेशाचा भंग करणाऱ्या आस्थापनांचा परवाना कोविड-19
प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत निलंबित करण्यात येईल.
17. सहकारी गृहनिर्माण संस्था
:
अ) कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेत एकावेळी पाच कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या
व्यक्ती आढळल्यास सदर सहकारी गृहनिर्माण संस्था सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून
घोषित केले जाईल.
ब) अशा गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांना प्रवेशबंदी
असल्याबाबतचा फलक लावणे बंधनकारक असेल.
क) सोसायटीमध्ये तयार करण्यात आलेल्या सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये कोणत्याही
नागरिकांचा प्रवेश व बाहेर जाणे याबाबत सोसायटीमार्फत प्रतिबंध करण्यात
यावा.
ड) जर एखाद्या गृहनिर्माण संस्थेने उक्त नमुद निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस
रक्कम रुपये 10,000/- दंड करण्यात येईल व दुसऱ्या वेळेस रक्कम रु.20,000/- दंड आकारण्यात येईल.
इ) सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थानी त्यांच्या संस्थेत वेळोवेळी येणाऱ्या व्यक्तींची
ते जोपर्यंत लस घेत नाहीत तोपर्यंत RTPCR चाचणी शासकीय निर्देशानुसार
करावी.
18. बांधकाम व्यवसाय
:
अ) ज्या बांधकाम क्षेत्रात बांधकामाशी संबंधीत कर्मचारी /
मजूर यांना त्याच ठिकाणी राहण्याची सोय आहे अशा बांधकाम व्यवसायास
परवानगी असेल. अशा ठिकाणी साधनसामुग्री वाहतूकी
व्यतिरिक्त कामगार व इतर वाहतूकीस परवानगी असणार नाही.
ब) ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यानी भारत सरकारच्या निकषानुसार
लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक RTPCR चाचणी प्रमाणपत्र 15 दिवसासाठी वैध राहील असे सोबत बाळगणे बंधनकारक राहील. सदर नियम
10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.
क) नियमांचे भंग करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांस
रक्कम रुपये 10,000/- दंड आकारण्यात येईल. तसेच पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लघन झाल्यास सदर बांधकामाचे ठिकाण हे कोव्हीड-19
संसर्ग कमी होत नाही, तोपर्यत बंद करण्यात येईल.
ड) एखाद्या कामगार हा कोव्हीड-19
विषाणू पॉझिटीव्ह आढळून आल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी. त्याला कामावर गैरहजर कारणास्तव कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कामगार यांस पूर्ण पगारी वेतन देण्यात यावे.
19. दंडनीय कारवाई
:
अ) शासन निर्णय दिनांक
27 मार्च, 2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद दंड या
आदेशास संलग्न असून तो पुढील आदेशापर्यंत लागू राहील.
ब) जमा होणाऱ्या दंडाची रक्कम
संबंधित स्थानिक प्राधिकारणाकडे देण्यात येईल. सदर दंडाच्या रक्कमेचा वापर कोव्हीड
-19 प्रतिबंधात्मक उपायोजनासाठी वापरण्यात येईल.
या आदेशांची अंमलबजावणी दिनांक
05 एप्रिल, 2021 रोजीपासून ते दिनांक 30 एप्रिल,
2021 चे रात्री 11.59 बाजेपर्यत लागू राहील. या आदेशाची
अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे
विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम
51 ते
60, व
भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम
188 नुसार
तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर
कारवाई संबंधित पोलीसअधिकारी, कर्मचारी यांनी करावी.
****
No comments:
Post a Comment