09 April, 2021

जिल्ह्यासाठी 770 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

 


हिंगोली, दि.09 (जिमाका): सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने माहे एप्रिल, मे आणि जून-2021 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्‍याचे जिल्‍ह्यासाठी  770 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  

तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली-184 क्विंटल, औंढा ना.-120 क्विंटल, सेनगाव-143.50 क्विंटल, कळमनुरी-162 क्विंटल, वसमत-160.50 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 770 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी  केले आहे.

*****

No comments: