हिंगोली,
(जिमाका) दि. 08 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना तसेच
जिल्हाधिकारी यांना भेट देण्यासाठी येणाऱ्या अभ्यांगताना दि. 30 एप्रिल, 2021
पर्यंत परवानगीस मनाई केली आहे. नागरिकांच्या कामासाठी ई-मेल पत्ता : rdc.hingoli123@gmail.com प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या
कामासाठी ई-मेलचा वापर करावा. तसेच खूप अपवादात्मक परिस्थितीत जिल्हाधिकारी यांची
भेट घ्यावयाची झाल्यास भेट देणाऱ्या अभ्यांगताकडे 15 दिवस कालावधीतील वैध असलेले
आरटीपीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक असलेले प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहेत,
असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी
यांनी दिले आहेत.
या आदेशाचे पालन न
करणाऱ्या संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय
दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार
तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये
दंडनीय , कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस
अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment