हिंगोली, (जिमाका) दि. 09 : कळमनुरी तालुक्यातील मौ. मसोड, वारंगा मसाई, दांडेगाव, नवखा,
आडा, दाती, तोंडापूर, घोडा, बऊर, सापळी, सुकळीवीर, बोल्डा, पेठवडगांव,
किल्लेवडगांव, तुप्पा, सालवाडी, कळमकोंडा, बोल्डावाडी, शिवणी खु. , चुंचा,
सालेगांव, डिग्रस (कों.), कुंभारवाडी (खंडोबा), म्हैसगव्हाण, मोरवड, कवडा या 26
गावात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी
वरील सर्व गावातील संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून
घोषित करण्यात आले आहेत.
या
परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व
आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना
आवश्यक त्या सेवा ग्रामपंचायत मार्फत
वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
या
आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम
188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment