02 October, 2016

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे चुकीचे खाते क्रमांक दुरूस्ती करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 2 :- जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, हिंगोली मार्फत राबविण्यात येणाऱ्या 1) अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती 2) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते 10 वी अनुसूचित जाती 3) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना इयत्ता 9 वी 10 वी चे सन 2013-14 ते सन 2015-16 या तीन वर्षाची शिष्यवृत्ती व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इ. 5 वी ते 7 वी विजाभज/विमाप्र सन 2013-14 या वर्षाची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना यापूर्वीच बँकेमार्फत अदा करण्यात आलेली आहे.
परंतू उपरोक्त वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे खाते क्रमांक चुकलेले आहेत. अशा सर्व शाळांनी आपल्या शाळांमधील जे विद्यार्थी चुकीचे खातेक्रमांक दिल्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांची यादी, बँकेचे अचूक खाते क्रमांक व पासबुकच्या झेरॉक्स प्रती मुख्याध्यापकांनी आपल्या स्वाक्षरीनिशी जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयास विनाविलंब सादर करावेत. तसेच सन 2015-16 मध्ये ऑनलाईन भरलेल्या शिष्यवृत्तीचे बरेच अर्ज शाळांच्या लॉग इन आयडी वर प्रलंबित दिसून येत आहेत, अशा शाळांनी त्यांच्या लॉगइन आयडी वरील प्रलंबित अर्ज या कार्यालयाकडे तात्काळ फॉरवर्ड करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. प्रलंबित अर्ज या कार्यालयाकडे फॉरवर्ड न केल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****


जिल्ह्यात हंगामात 99.24 टक्के पावसाची नोंद
गत 24 तासात सरासरी 38.00 मिलीमीटर पाऊस

          हिंगोली, दि. 2 :- जिल्ह्यात रविवार दिनांक 02 ऑक्टोबर, 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 189.98 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी 38.00  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 883.61 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात या हंगामात  पडलेल्या पावसाची टक्केवारी 99.24 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) औंढा नागनाथ - 117.18, हिंगोली - 109.33, वसमत - 92.92, कळमनुरी - 91.40, सेनगांव - 87.57 जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  99.24 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात रविवार दिनांक 02 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 58.00 (915.74), वसमत - 21.57 (928.54), कळमनुरी - 19.33 (858.80), औंढा नागनाथ - 47.25  (981.50), सेनगांव - 43.83 (733.49). आज  अखेर  पावसाची सरासरी 883.61 इतकी आहे.

***** 
जिल्हाधिकारी कार्यालयात
महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन

हिंगोली, दि. 2 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी आदी उपस्थित होते.  

****


 

01 October, 2016

खडकपूर्णा प्रकल्प धरणाखालील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  

हिंगोली,दि.1:- खडकपूर्णा धरणाची पूर्ण संचय पातळी 520.50 (पाणीसाठा 160.606 द.ल.घ.मी.) असून आज दिनांक 1 ऑक्टोबर, 2016 रोजी 13-00 वाजता धरणातील पातळी 520.27 मी. असून एकूण पाणीसाठा 153.92 द.ल.घ.मी. (95.84 टक्के) तसेच उपयुक्त साठा 86.72 द.ल.घ.मी. (92.84 टक्के) झालेला आहे. धरण पूर्ण क्षमेतेने भरण्यासाठी फक्त 23 सें.मी. बाकी असून साठवण क्षमता 6.68 द.ल.घ.मी. बाकी आहे. सद्यस्थितीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा व नागपूर येथील हवामान वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे धरण केंव्हाही पूर्ण भरु शकते. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.
त्यामुळे धरणाच्या खालील नदी काळावरील नागरी भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात सोडण्यास येणाऱ्या पूर विसर्गाबाबत सतर्कतेचा इशारा देणे आवश्यक आहे, खडकपूर्णा प्रकल्प विभाग , देऊळगांव राजा कार्यकारी अभियंता व बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.  

**** 
दिनांक 01 नोव्हेंबर, 2016 या अर्हता दिनांकावर आधारीत
शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम

            हिंगोली,दि.1:- दिनांक 1 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी नव्‍याने तयार करण्याचे निर्देश मा. भारत निवडणूक आयोगाने पत्र क्र. 37/LC/INST/ECI/FUNC/ERD/ER/2016 दिनांक: 16 सप्टेंबर, 2016 अन्वये दिले आहेत. त्‍यानुसार औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची यापूर्वी तयार केलेली मतदार यादी रद्द करुन नवीन मतदार यादी तयार करण्‍यात येत आहे.  या यादीसाठी यापुर्वी नाव नोंदणी केलेली असली तरी शिक्षक मतदारांनी नव्‍याने नमुना 19 मधील अर्ज करणे आवश्‍यक राहील.
त्‍यानुसार सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक 05 नोव्‍हेंबर 2016 पर्यंत यादीत नाव नोंदविण्‍यासाठी संबंधीत तहसिलदार तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे नमुना- 19 मधील अर्ज सादर करावेत.
मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे
कालावधी
1
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक
दिनांक: 01 आक्टोबर, 2016 (शनिवार)
2
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी
दिनांक: 15 ऑक्टोबर, 2016 (शनिवार)
3
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिध्दी
दिनांक: 25 ऑक्टोबर, 2016 (मंगळवार)
4
नमुना अर्ज- 19 मधील दावे स्विकारण्याचा अंतिम दिनांक
दिनांक: 5 नोव्हेंबर, 2016 (शनिवार)
5
हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई
दिनांक: 19 नोव्हेंबर, 2016 (शनिवार)
6
प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी
दिनांक: 23 नोव्हेंबर, 2016 (बुधवार)
7
नमुना अर्ज- 19 मधील दावे व नमुना अर्ज-7 व 8 मधील हरकती स्वीकारण्याचा कालावधी
दिनांक: 23 नोव्हेंबर, 2016 (बुधवार) ते दिनांक: 8 डिसेंबर, 2016 (गुरूवार)
8
दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे
दिनांक: 26 डिसेंबर, 2016 (सोमवार) पर्यंत
9
मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी
दिनांक: 30 डिसेंबर, 2016 (शुक्रवार)
शिक्षक मतदार यादीत मतदार नोंदणीसाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे:- ती व्यक्ती औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्वसाधारण राहीवासी असावी. दिनांक 01.11.2016 पासून मागील सहा (6) वर्षा पैकी किमान तीन (3) वर्षे माध्‍यमिक पेक्षा कमी दर्जा नसलेल्‍या शाळेचा शिक्षक म्‍हणून कार्यरत असणे आवश्‍यक आहे. माध्यमिक शाळे पैक्षा कमी दर्जा नसलेल्या शाळेत दिनांक 01.11.2016 पासून मागील सहा (6) वर्षा पैकी किमान तीन (3) वर्षे अध्यापनाचे काम केल्याबाबतचे प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी सही व शिक्यानिशी निर्गमित केलेले परिशिष्ट- ब मधील प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
            जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदारांनी या मतदार नोंदणी कार्यक्रमाची नोंद घेवून मतदार यादीत नोंदणीसाठी वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली यांचे वतीने करण्यात येत आहे.


******  


जिल्ह्याया हंगामात 94.98 टक्के पावसाची नोंद

          हिंगोली, दि. 1 :- जिल्ह्यात शनिवार दिनांक 01 ऑक्टोबर, 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 55.39 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी 11.08  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 845.62 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात या हंगामात  पडलेल्या पावसाची टक्केवारी 94.98 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) औंढा नागनाथ - 111.54, हिंगोली - 102.40, वसमत - 90.76, कळमनुरी - 89.34, सेनगांव - 82.34 जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  94.98 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात शनिवार दिनांक 01 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 13.43 (857.74), वसमत - 15.29 (906.97), कळमनुरी - 13.00 (839.47), औंढा नागनाथ - 9.50  (934.25), सेनगांव - 4.17 (689.66). आज  अखेर  पावसाची सरासरी 845.62 इतकी आहे.
*****
अकृषिक वापर सहाय्यभूत समिती बैठक संपन्न  
         हिंगोली, 1 :- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 44 अन्वये खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनाकरिता जमिनीचा अकृषिक वापर सुलभ करण्याकरिता उद्योजकास विविध विभाग व प्राधिकरण यांच्याकडून आवश्यक प्रमाणित माहिती एक खिडकी सरंचनेतर्गत एकत्रितरित्या उपलब्ध होण्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक अकृषिक वापर सहाय्यभूत समितीची तसेच मेक इन इंडियाच्या शासन धोरणानुसार बैठक अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात नुकतीच संपन्न झाली.
अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यावेळी म्हणाले की, ग्रामीण तसेच शहरी भागातील उद्योगपतींनी त्यांच्या खाजगी जमिनीवर छोटे उद्योग उभे केली असतील तर त्याबाबत सर्व कागदपत्रे, नकाशासह, नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी याबाबत अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली मैत्री कक्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे .
तसेच उद्योग उभारणीविषयी आयोजकांना इतर विभागाबाबत जसे महावितरण , सार्वजनिक बांधकाम विभाग, बँक, नगर रचना, नगर परिषद, उद्योग विभाग, एमआयडीसी विभाग, सहकार विभाग, वन विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाबाबत कांही अडचणी असल्यास अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा . सदर अडचणींना सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे श्री. गगराणी यावेळी म्हणाले.    

यावेळी बैठकीस नगर रचना सहाय्यक संचालक सु. ल. कमठाणे, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, जिल्हा उपनिबंधक नरेंद्र निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डि. बी. निळकंठ, एमआयडीसीचे एरिया मॅनेजर एम. आर. महाडिक आदी विविध विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थित होते.