मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे चुकीचे खाते क्रमांक दुरूस्ती करण्याचे
आवाहन
हिंगोली, दि. 2 :- जिल्हा समाज कल्याण कार्यालय,
जिल्हा परिषद, हिंगोली मार्फत राबविण्यात येणाऱ्या 1) अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या
पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती 2) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते
10 वी अनुसूचित जाती 3) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती योजना इयत्ता 9 वी 10 वी चे सन 2013-14 ते सन 2015-16 या तीन वर्षाची
शिष्यवृत्ती व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इ. 5 वी ते 7 वी विजाभज/विमाप्र सन
2013-14 या वर्षाची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना यापूर्वीच बँकेमार्फत अदा करण्यात
आलेली आहे.
परंतू उपरोक्त वर्षातील ज्या
विद्यार्थ्यांचे खाते क्रमांक चुकलेले आहेत. अशा सर्व शाळांनी आपल्या शाळांमधील जे
विद्यार्थी चुकीचे खातेक्रमांक दिल्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. अशा
विद्यार्थ्यांची यादी, बँकेचे अचूक खाते क्रमांक व पासबुकच्या झेरॉक्स प्रती
मुख्याध्यापकांनी आपल्या स्वाक्षरीनिशी जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,
हिंगोली या कार्यालयास विनाविलंब सादर करावेत. तसेच सन 2015-16 मध्ये ऑनलाईन
भरलेल्या शिष्यवृत्तीचे बरेच अर्ज शाळांच्या लॉग इन आयडी वर प्रलंबित दिसून येत आहेत,
अशा शाळांनी त्यांच्या लॉगइन आयडी वरील प्रलंबित अर्ज या कार्यालयाकडे तात्काळ
फॉरवर्ड करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. प्रलंबित
अर्ज या कार्यालयाकडे फॉरवर्ड न केल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी
शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना जबाबदार
धरले जाईल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment