16 October, 2016

जन्म व मृत्यू नोंदणी संदर्भातील बैठक संपन्न

हिंगोली, दि. 16 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 च्या अंमलबजावणी बैठक जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली .
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड,जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती ढेरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी श्री. धनवे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी तसेच आदि विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खाजगी व शासकीय आरोग्य संस्थामधील जन्म मृत्यू अंतर्गत घटनांची नगर परिषद, नगर पंचायत , ग्रामपंचायतला विहीत नमुन्यात वेळेवर सादर करण्याबाबतच्या अडचणी, खाजगी रुग्णलयांत जन्म मृत्यू अंतर्गत घटनेची माहिती संबंधित अधिकारी किंवा त्यांनी नेमलेला अन्य अधिकारी निबंधकास अशी माहिती विहीत नमुन्यात वेळेत देणे, जन्म मृत्यू अंतर्गत घरी घटना असेल तर कुंटूंब प्रमुख, नातेवाईक , आशा, अंगणवाडी सेविका , दाई आरोग्य सेविका यांनी देणे बंधनकारक आहे.  तसेच आरोग्य संस्थेत व घरी आलेले अर्भक मृत्यू , बाल मृत्यू व माता मृत्यूची नोंदणी निबंधकाकडे होणे बंधनकारक असावे. याबाबत आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांनी काटेकार देखरेख असावी याबाबत महिला पदाधिकारी , सरपंच , पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य , महिला बचत गट यांचे सहकार्य घ्यावे, असे जिल्हाधिकारी श्री . भंडारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांना आरोग्य  माहिती जीवनविषयक आकडेवारी आरोग्य विभाग, नागरी नोंदणी पध्दती निर्देशांक , मृत्यू नोंदणी अहवाल, जन्म नोंदणी अहवाल विषयीची माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांनी दिली.

***** 

No comments: