जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त
एक दिवशीय कार्यशाळेस
उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 3 :- केंद्र शासनाचे जेष्ठ नागरीकांचे
कल्याणासाठी आई-वडील व ज्येष्ठ नागरीक यांचे चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007
पारीत केला असून सदरचा अधिनियम शासनाने दिनांक 1 मार्च, 2009 पासून लागू केलेला
आहे. केंद्र शासनाचे अधिनियमाचे अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक 23 जून, 2010
अन्वये नियम 2010 पारीत केलेला आहे.
तसेच राज्य शासनाने सन
2013 मध्ये राज्याचे ज्येष्ठ नागरीक धोरण जाहिर केलेले आहे. दरवर्षी दिनांक 1
ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून
ज्येष्ठ नागरीकांचे संदर्भातील कायदे शासनाच्या विविध योजनांची माहिती या
माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत सुलभरित्या होण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज
कल्याण कार्यालय यांच्यावतीने एक दिवसीय कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक
न्याय भवन सांस्कृतिक सभागृह, हिंगोली येथे दि. 05 ऑक्टोबर, 2016 रोजी दुपारी 3.00
वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
या कार्यशाळेस ज्येष्ठ
नागरीकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज
कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment