दिनांक 01 नोव्हेंबर, 2016 या अर्हता दिनांकावर आधारीत
शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम
हिंगोली,दि.1:- दिनांक 1 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघाची
मतदार यादी नव्याने तयार करण्याचे निर्देश मा. भारत निवडणूक आयोगाने पत्र क्र. 37/LC/INST/ECI/FUNC/ERD/ER/2016
दिनांक: 16 सप्टेंबर, 2016 अन्वये दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद
शिक्षक मतदारसंघाची यापूर्वी तयार केलेली मतदार यादी रद्द करुन नवीन मतदार यादी तयार
करण्यात येत आहे. या यादीसाठी यापुर्वी नाव
नोंदणी केलेली असली तरी शिक्षक मतदारांनी नव्याने नमुना 19 मधील अर्ज करणे आवश्यक
राहील.
त्यानुसार सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक 05 नोव्हेंबर
2016 पर्यंत यादीत नाव नोंदविण्यासाठी संबंधीत तहसिलदार तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे
नमुना- 19 मधील अर्ज सादर करावेत.
मतदार
यादी तयार करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र.
|
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे
|
कालावधी
|
1
|
मतदार
नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक
|
दिनांक:
01 आक्टोबर, 2016 (शनिवार)
|
2
|
मतदार
नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी
|
दिनांक:
15 ऑक्टोबर, 2016 (शनिवार)
|
3
|
मतदार
नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिध्दी
|
दिनांक:
25 ऑक्टोबर, 2016 (मंगळवार)
|
4
|
नमुना
अर्ज- 19 मधील दावे स्विकारण्याचा अंतिम दिनांक
|
दिनांक:
5 नोव्हेंबर, 2016 (शनिवार)
|
5
|
हस्तलिखिते
तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई
|
दिनांक:
19 नोव्हेंबर, 2016 (शनिवार)
|
6
|
प्रारूप
मतदार याद्यांची प्रसिध्दी
|
दिनांक:
23 नोव्हेंबर, 2016 (बुधवार)
|
7
|
नमुना
अर्ज- 19 मधील दावे व नमुना अर्ज-7 व 8 मधील हरकती स्वीकारण्याचा कालावधी
|
दिनांक:
23 नोव्हेंबर, 2016 (बुधवार) ते दिनांक: 8 डिसेंबर, 2016 (गुरूवार)
|
8
|
दावे
व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे
|
दिनांक:
26 डिसेंबर, 2016 (सोमवार) पर्यंत
|
9
|
मतदार
याद्यांची अंतिम प्रसिध्दी
|
दिनांक:
30 डिसेंबर, 2016 (शुक्रवार)
|
शिक्षक मतदार यादीत मतदार नोंदणीसाठीची पात्रता पुढीलप्रमाणे
आहे:-
ती व्यक्ती औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्वसाधारण राहीवासी असावी. दिनांक
01.11.2016 पासून मागील सहा (6) वर्षा पैकी किमान तीन (3) वर्षे माध्यमिक पेक्षा कमी
दर्जा नसलेल्या शाळेचा शिक्षक म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळे पैक्षा
कमी दर्जा नसलेल्या शाळेत दिनांक 01.11.2016 पासून मागील सहा (6) वर्षा पैकी किमान
तीन (3) वर्षे अध्यापनाचे काम केल्याबाबतचे प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी सही व शिक्यानिशी
निर्गमित केलेले परिशिष्ट- ब मधील प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यातील
शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदारांनी या मतदार नोंदणी कार्यक्रमाची नोंद घेवून मतदार
यादीत नोंदणीसाठी वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली
यांचे वतीने करण्यात येत आहे.
******
No comments:
Post a Comment