05 October, 2016

जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

          हिंगोली, दि. 5: केंद्र शासनाचे जेष्ठ नागरीकांचे कल्याणासाठी आई-वडील व ज्येष्ठ नागरीक यांचे चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 पारीत केला असून सदरचा अधिनियम शासनाने दि. 1 मार्च, 2009 पासून लागू केला आहे. केंद्र शासनाचे अधिनियमाचे अनुषंगाने राज्य शासनाने दि. 23 जून, 2010 अन्वये नियम 2010 पारीत केला आहे. यानुसार राज्याने ज्येष्ठ नागरीक धोरण जाहिर केलेले असून दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरीक दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह, हिंगोली येथे दि. 05 ऑक्टोबर, 2016 रोजी साजरा करण्यात आलेला आहे.
 सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी राम गणराणी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. नारायणराव मुटकुळे, प्राध्यापक डॉ. शत्रुघ्न जाधव, जिल्हयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाज भुषण पुरस्कारार्थी मधुकरराव मांजरमकर, दत्तराव बचनाजी पाटोळे, वसंत रामचंद्र मुळे, आनंदराव शिखरे, विक्रम जावळे, श्रीमती राधिका चिंचोलीकर आदी प्रमुख जेष्ठ पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी जेष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरीकांचे संदर्भातील जेष्ठ नागरीकांनी आपल्याला न्याय मिळण्यासाठी त्या-त्या तालुक्यातील  उपविभागीय अधिकारी, (महसुल) यांचे मार्फत व तहसिलदार तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालया मार्फत सदर योजनेचा लाभा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
  ॲड. नारायणरावजी मुटकुळे यांनी जेष्ठ नागरीकांच्या कायदे विषयक बाबीचे सखोल मार्गदर्शन केले. डॉ. शत्रुघ्न जाधव-प्राध्यापक यांनी  जेष्ठ नागरीक संबंधित शासनाच्या विविध योजनांची माहिती  देण्यात आली. तसेच सामाजिक न्याय विभागांकडून समाज भूषण पुरस्कार्थींनी सामाजिक न्याय विभागांतील कार्यरत योजनांचा सर्व सामान्य नागरीकांना कसा लाभ घेता येतो या बाबतचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हयातील मोठया प्रमाणात जेष्ठ नागरीक व नेहरू युवा व सांस्कृतिक क्रिडा मंडळाचे जेष्ठ नागरीक उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविक समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे व आभार प्रदर्शन जिल्हा प्रकल्प अधिकारी, बार्टी सिध्दार्थ गोवंदे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्या अधिनस्त सर्व कर्मचारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली येथील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. 
*****


No comments: