15 October, 2016

शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य
हिंगोली, दि. 15 : आधार (Targeted delivery of Financial and Other Subsidies, Benefit[ Services) Act, 2016 च्या कलम 7 नुसार आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट करावयाच्या ज्या शिधापत्रिकाधारकांकडे आधार क्रमांक उपलब्ध नसेल अशा लाभार्थ्यांनी आधार केंद्रावरून त्वरीत आधार क्रमांक उपलब्ध करून घेण्यात यावा. तसेच ज्यांनी अद्याप पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करून दिलेला नसेल अशा अत्योंदय अन्न योजना / प्राधान्य कुटूंब योजना / एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी दिनांक 15 नोव्हेंबर, 2016 रोजी पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करून देणे या कायद्यांतर्गत अनिवार्य करण्यात आलेले आहे.
ज्या लाभार्थ्यांना सध्या अन्नधान्याचा लाभ मिळत आहे, परंतू त्यांनी अद्याप आपला आधार क्रमांक उपलब्ध करून दिलेला नाही अशा सर्व लाभार्थ्यांची नावे दि. 16 नोव्हेंबर, 2016 पासून यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येवून त्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही.
तरी सर्व योजनेतील लाभार्थ्यांना याव्दारे आवाहन करण्यात येत असून आपला आधार क्रमांक अद्याप संबंधीत रास्तभाव दुकानदार / कार्यालय यांचेकडे उपलब्ध करून दिलेला नसेल त्यांनी दि. 15 नोव्हेंबर, 2016 रोजी पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा. नसता सदर कायद्यानूसार आपली नावे यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येवून अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

***** 

No comments: