वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व व्याख्यान संपन्न
हिंगोली, दि. 15 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोलीच्या
वतीने भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल
कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस “
वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्यात आला.
या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या वेळी ग्रंथप्रदर्शनाचे
उद्घाटन दिपप्रज्वलनाने प्रा. विलास वैद्य, प्रसिध्द कवी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक
अशोक अर्धापुरकर हे होते. तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी मान्यवरांचे
ग्रंथभेट देऊन स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी
प्रा.विलास वैद्य यांचे “
वाचन संस्कृती ” या विषयावर व्याख्यान झाले. तसेच त्यांनी यावेळी कविता सादर केली.
काल महया सजनाचा मन कागुद
ग आला
जीव चोळामोळा पुन्हा
देवळीत ठुला
पुसले नंदेला गं काय
कागुद गं आला
तीनं वटारले गं डोळे
त्यात साजन गं दिसला..
तसेच
साहित्यिक अशोक अर्धापुरकर यांचे अध्यक्षीय भाषणात वाचनाबाबतचे फायदे सांगितले. यावेळी बंडू देशमुख, राजू कल्याणकर या विदयार्थ्यांनी वाचन
प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकांविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन
व आभार प्रदर्शन प्र.त्रि.पाटील यांनी केले. यावेळी कार्यालयाचे श्री. पुनसे, श्री.
कापसे व विदयार्थी वाचक उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment