गैरन्यायीक सदस्य पदाकरिता
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 13 : राज्य
ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य येथे गैरन्यायीक सदस्य यांची रिक्त पदे
भरण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाकरीता ग्राहक
संरक्षण अधिनियम 1986 तसेच सुधारीत महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 2000
च्या संबंधीत तरतुदी लागु आहेत. उमेदवारांची अर्हता पात्रतेचे निकष यासंबधीची माहिती
व विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच हिंगोली या कार्यालयात आवश्यक
शुल्क रुपये 100/- (अक्षरी शंभर रुपये) भरून उपलब्ध होवू शकतील. संपुर्ण तपशिलासह
भरलेले अर्ज मा. प्रबंधक प्रशासन राज्य ग्राहक वाद निवारण आयोग,महाराष्ट्र राज्य
मुंबई यांचे कार्यालयात दिनांक 05 नोंव्हेंबर, 2016 पुर्वी पोहचणे आवश्यक आहे.
याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण
मंच हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment