01 October, 2016

खडकपूर्णा प्रकल्प धरणाखालील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  

हिंगोली,दि.1:- खडकपूर्णा धरणाची पूर्ण संचय पातळी 520.50 (पाणीसाठा 160.606 द.ल.घ.मी.) असून आज दिनांक 1 ऑक्टोबर, 2016 रोजी 13-00 वाजता धरणातील पातळी 520.27 मी. असून एकूण पाणीसाठा 153.92 द.ल.घ.मी. (95.84 टक्के) तसेच उपयुक्त साठा 86.72 द.ल.घ.मी. (92.84 टक्के) झालेला आहे. धरण पूर्ण क्षमेतेने भरण्यासाठी फक्त 23 सें.मी. बाकी असून साठवण क्षमता 6.68 द.ल.घ.मी. बाकी आहे. सद्यस्थितीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा व नागपूर येथील हवामान वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे धरण केंव्हाही पूर्ण भरु शकते. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.
त्यामुळे धरणाच्या खालील नदी काळावरील नागरी भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात सोडण्यास येणाऱ्या पूर विसर्गाबाबत सतर्कतेचा इशारा देणे आवश्यक आहे, खडकपूर्णा प्रकल्प विभाग , देऊळगांव राजा कार्यकारी अभियंता व बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.  

**** 

No comments: