05 June, 2018

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांचा दौरा
हिंगोली, दि. 5 : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे हिंगोली दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.
बुधवार दि. 6 जून, 2018 रोजी नांदेड येथून सायंकाळी 5.00 वा. कळमनुरी जि. हिंगोली येथे आगमन. आणि डॉ. शंकरराव सातव आर्टस, कॉमर्स महाविद्यालय कळमनुरी येथे दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप करणार आहेत. त्यानंतर दुपारी 5.30 वाजता कळमनुरी येथून वाहनाने परभणीकडे प्रयाण करतील.     
*****

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचा दौरा


पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांचा दौरा
हिंगोली, दि. 5 : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.  
बुधवार, दि. 06 जून, 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता परळी जि. बीड येथून मोटारीने औंढा नागनाथ जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 2.00 वाजता औंढा नागनाथ जि. हिंगोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.30 वाजता औंढा नागनाथ नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या भूमीपूजन / उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4.30 वाजता मोटारीने जालन्याकडे प्रयाण करतील.
*****

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम


पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 5 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे बुधवार दि. 06 जून, 2018 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
बुधवार, दि. 06 जून, 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता (गोपीनाथ गड) परळी, जि. बीड येथून वाहनाने औंढा नागनाथ जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह औंढा नागनाथ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता औंढा नागनाथ नगर परिषद येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4.30 वाजता औंढा नागनाथ येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण करतील.
*****

02 June, 2018

हंगामाच्या काळात खाजगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकिटदर आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन


हंगामाच्या काळात खाजगी बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकिटदर आकारल्यास
 तक्रार करण्याचे आवाहन
            हिंगोली, दि. 2 : राज्य शासनाने दि. 27 एप्रिल, 2018 च्या शासन निर्णयाव्दारे कंत्राटी वाहनांचे ( खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ. ) महत्तम भाडेकर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरित प्रभावाने अंमलात आला आहे. कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहित दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल तर त्याविषयी मोटार वाहन विभागाच्या 022-62426666 या निशुल्क तक्रार नोंदणी क्रमांकावर तक्रार नोंदविण्यात यावी, असे परिवहन आयुक्त कार्यालय यांच्याव्दारे कळविण्यात आलेले आहे. मुंबईसाठी 18800220110 या निशुल्क क्रमांकावरही तक्रार नोंदविता येईल.
            तसेच अशी तक्रार विभागाच्या www.transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर देखील नोंदविता येऊ शकेल. तक्रारी संदर्भाने उचित चौकशी अंती संबंधित कंत्राटी बस परवाना धारकांच्या परवान्यावर निलंबनाची /रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. या शासन निर्णयाव्दारे खाजगी कंत्राटी वाहनांना (खाजगी बस, ट्रॅव्हल्स इ. ) गर्दीच्या हंगामाच्या काळात एस. टी. बसच्या तुलनेत जास्तीत-जास्त दीडपट भाडे आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****

खरिप हंगाम 2018 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन


खरिप हंगाम 2018
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
            हिंगोली, दि. 2 : शासनाने खरिप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना हिंगोली जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दि. 24 जुलै, 2018 पर्यंत आहे. अधिसुची क्षेत्रात, अधिसुचित पिक घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्यासह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
                हिंगोली जिल्हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासनामार्फत पुढील विमा कंपनीस नेमले आहे. इफ्को टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, सहावा मजला, सुयोग प्लाटिनम मंगलदास रोड, पुणे-411001, दुरध्वनी क्रमांक 020-67278900, टोल फ्री क्र. 18001035499, ईमेल आयडी – agrimh@iffcotokio.co.in.
                प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2018 मध्ये राबविण्यात येतआहे. योजनेअंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील खालीलप्रमाणे आहे. (जोखीमस्तर 70 टक्के)
               
अ.क्र.
पिकाचे नाव
विमा संरक्षित रक्कम
(रु. प्रति हेक्टर)
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु.)
1
खरीप ज्वारी
24000/-
480/-
2
तुर
31500/-
378/-
3
मुग
18900/-
378/-
4
उडीद
18900/-
401/-
5
सोयाबीन
42000/-
924/-
6
सुर्यफुल
23100/-
462/-
7
कापुस
42000/-
567/-
विमा संरक्षणाच्या बाबी : 1) पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट (Standing Crops) 2) पीक पेरणीपुर्व/लावणीपुर्व नुकसान भरपाई निश्चित करणे. 3) हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे. 4) काढणी पश्चात नुकसान. 5) स्थानिक नैसर्गिक आपत्ती.
                खरीप 2018 पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खातेपुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत पुढीलपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. 1) मतदान ओळखपत्र किंवा 2) किसान क्रेडिटकार्ड किंवा 3) नरेगा जॉबकार्ड किंवा 4) वाहनचालक परवाना.
                खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना व फळपीक विमा योजनेत सहभागी होणेसाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरित बँकेशी संपर्क करावा त्याचप्रमाणे, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमुद करावे लागणार आहे. यासंदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधारकार्ड नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित नजीकचे आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करून नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करावी.
                अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून येत्या खरिप हंगामपासून मंडळ किंवा तालुकापातळीवर आपले सरकार सेवा केंद्र (महा-ई सेवा केंद्र) सुविधा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज भरण्याकरिता उपलब्ध करण्यात आली असून ही सेवा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अर्ज भरून बँकेत सादर करावेत.
                पिक विमा भरावयाचा अंतिम दि. 24 जुलै, 2018 असून अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****

01 June, 2018


सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

            हिंगोली, दि. 1 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना देऊन सन्मानित करण्याची योजना कार्यान्वित आहे. सदरील पुढील चार पुरस्कार व्यक्ती/संस्थाना देण्यात येत आहे : 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, 2) साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, 3) पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, 4) संत रविदास पुरस्कार  आणि 1) शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक पुरस्कार, 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार हे दोन पुरस्कार संस्थेसाठी देण्यात येतो.
            सदरील पुरस्काराचा लाभ मिळण्यासाठी अर्जाचा नमुना https://sjsa.maharashtra.gov.in व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे उपलब्ध असून परिपुर्ण प्रस्ताव दि. 15 जून, 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

            हिंगोली, दि. 1 : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअतंर्गत मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देऊन,ही  योजना  जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे  पोहोचविणाऱ्या पत्रकारांसाठी शासनाने  जिल्हा, विभाग   राज्य स्तरावर पुरस्कार  देण्याची  योजना जाहीर केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपल्या  प्रवेशिका शुक्रवार दि. 15 जून, 2018 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महात्मा गांधी तंटामुक्त गाव  मोहीम पत्रकार पुरस्कार  जिल्हास्तरीय  समितीच्यावतीने करण्यात  आले आहे. 
           जिल्हास्तरीय प्रथम  पुरस्कार रुपये 25 हजार, द्वितीय पुरस्कार रुपये 15 हजार आणि तृतीय पुरस्कार रुपये 10 हजार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी 2 मे 2017 ते 1 मे 2018 या कालावधीमध्ये प्रसिध्द केलेले लिखाण पुरस्कार पात्रतेकरिता मल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल. नमूद कालावधीत वृत्तपत्रे / नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्तपत्रकार पात्र  असतील. पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ, ,  वर्गवारीतील  वृत्तपत्रे / नियतकालिके  यामधून प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच या पारितोषिकांसाठी विचार  करण्यात येईल.
         एका वर्तमानपत्राच्या  प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल.  जिल्ह्यातून  प्रथम  क्रमांक  मिळविलेल्या  पत्रकारांचे  विभागीय  स्तरावरील  पुरस्कारासाठी  आपोआप नामनिर्देशन होईल तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन  होईल. 
हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, प्रशासकीय इमारत, एस-6, हिंगोली-431513 (दूरध्वनी क्र. 02456 -222635)  यांच्याकडे शुक्रवार दि. 15 जून  2018  पर्यंत  पाठवाव्यात.
*****