खरिप हंगाम
2018
शेतकऱ्यांना
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 2 :
शासनाने खरिप हंगाम 2018 मध्ये
प्रधानमंत्री पिक विमा योजना हिंगोली जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून या
योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दि. 24 जुलै, 2018 पर्यंत आहे.
अधिसुची क्षेत्रात, अधिसुचित पिक घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्यासह)
सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
हिंगोली जिल्हा प्रधानमंत्री पिक
विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासनामार्फत पुढील विमा कंपनीस नेमले आहे.
इफ्को टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, सहावा मजला, सुयोग प्लाटिनम मंगलदास
रोड, पुणे-411001, दुरध्वनी क्रमांक 020-67278900, टोल फ्री क्र. 18001035499,
ईमेल आयडी – agrimh@iffcotokio.co.in.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप
हंगाम 2018 मध्ये राबविण्यात येतआहे. योजनेअंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित
रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील खालीलप्रमाणे आहे. (जोखीमस्तर
70 टक्के)
अ.क्र.
|
पिकाचे नाव
|
विमा संरक्षित रक्कम
(रु. प्रति हेक्टर)
|
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु.)
|
1
|
खरीप ज्वारी
|
24000/-
|
480/-
|
2
|
तुर
|
31500/-
|
378/-
|
3
|
मुग
|
18900/-
|
378/-
|
4
|
उडीद
|
18900/-
|
401/-
|
5
|
सोयाबीन
|
42000/-
|
924/-
|
6
|
सुर्यफुल
|
23100/-
|
462/-
|
7
|
कापुस
|
42000/-
|
567/-
|
विमा संरक्षणाच्या बाबी : 1)
पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट (Standing Crops)
2) पीक पेरणीपुर्व/लावणीपुर्व नुकसान भरपाई निश्चित करणे. 3) हंगामातील प्रतिकुल
परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे. 4) काढणी पश्चात नुकसान. 5) स्थानिक
नैसर्गिक आपत्ती.
खरीप
2018 पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार
शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खातेपुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित
प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत
पुढीलपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. 1) मतदान ओळखपत्र किंवा
2) किसान क्रेडिटकार्ड किंवा 3) नरेगा जॉबकार्ड किंवा 4) वाहनचालक परवाना.
खरीप
हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना व फळपीक विमा योजनेत सहभागी
होणेसाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी
त्वरित बँकेशी संपर्क करावा त्याचप्रमाणे, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा
योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच
अर्जावर नमुद करावे लागणार आहे. यासंदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधारकार्ड
नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित नजीकचे आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करून नोंदणीची
प्रक्रिया पुर्ण करावी.
अर्ज
भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता
यावी म्हणून येत्या खरिप हंगामपासून मंडळ किंवा तालुकापातळीवर “ आपले सरकार सेवा केंद्र ” (महा-ई सेवा केंद्र) सुविधा
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज भरण्याकरिता उपलब्ध करण्यात आली
असून ही सेवा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अर्ज भरून बँकेत
सादर करावेत.
पिक
विमा भरावयाचा अंतिम दि. 24 जुलै, 2018 असून अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषी
अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment