बालकल्याण समितीची स्थापना
हिंगोली,
दि. 19:- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम
2015 ची अंमलबजावणी करण्यात येते . या अधिनियमातील
कलम 29(1) नुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या
बालकांच्या प्रकरणी त्यांच्या पुनर्वसन
व सामाजिक पुन:स्थापनासाठी निर्णय घेण्याचे अधिकार
अधिनियमातील कलम 27(1) नुसार स्थापन करण्यात आलेल्या बाल
कल्याण समितीस आहेत. त्यामुळे काळजी
व संरक्षणाची गरज असलेले बालक समिती समोर सादर होऊन त्या बालकास
अधिनियमाच्या कलम 50 (1) अन्वये स्थापन
करण्यात आलेल्या बालगृहात
दाखल करण्याचे अधिकार बाल कल्याण समितीस आहेत व कलम 27(8) नुसार मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा
न्यायदंडाधिकारी यांना बाल कल्याण समितीचा त्रैमासिक
आढावा घेण्याचे अधिकार आहेत. हिंगोली जिल्ह्यात बाल न्याय
(मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 नुसार नवीन बाल कल्याण समिती नियुक्त झाली असून सदर च्या
नवनियुक्त बाल कल्याण समितीची प्रथम बैठक दिनांक 8 जून 2018 रोजी सायं. 5.00 वाजता जिल्हाधिकारी
, हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
हिंगोली जिल्ह्याच्या नवनियुक्त बाल कल्याण
समितीचे अध्यक्ष श्री. अभय कुमार भरतीया (मो. 7020430520) व इतर 3 सदस्य पुढीलप्रमाणे आहेत- श्रीमती जया करडेकर (मो.9850076835) श्री. संभाजी माने (मो.9822991143)
आणि श्री. विक्रम जावळे (मो.9850377020) हे
आहेत. बाल कल्याण समितीचे कामकाज आदर्श कॉलेज
जवळ , सावरकर नगर , हिंगोली येथून चालते . अनाथ , काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांबाबत आवश्यक
असल्यास बालकल्याण समितीस वरील पत्यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment