विद्यार्थ्यांनी व्दिलक्षी अभ्यासक्रमास
मान्यता असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा
हिंगोली, दि. 26 : जिल्ह्यातील इयत्ता 10 वी
उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी इयत्ता - 11 वी व्दिलक्षी अभ्यासक्रमास ( क्रॉप सायन्स,
कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र, इत्यादी ) प्रवेश
घेत असतांना सदरील अभ्यासक्रमास शासनाची मान्यता असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात
प्रवेश घेण्यात यावा. शासनाची मान्यता नसलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास
होणाऱ्या परिणामास संबंधित विद्यार्थी स्वत: जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
शासनामान्य प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयाची यादी
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी स्टेडियम जवळ परभणी या कार्यालयाच्या
सुचना फलकावर लावण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी (02452-221228) या क्रमांकावर
संपर्क साधण्याचे आवाहन परभणीचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सौ.
एम. डी. देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment